Weather Update : राज्यात पुढील संपूर्ण आठवडा पावसाचा; ‘या’ भागांमध्ये बरसणार!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या काहीसे संमिश्र हवामान (Weather Update) पाहायला मिळत आहे. आज (ता.6) राज्यात प्रामुख्याने विदर्भ पट्ट्यात उष्णतेची तीव्र लाट पाहायला मिळू शकते. तर उद्यापासून (ता.7) पुढील आठवडाभर राज्यात पावसाचे वातावरण पाहायला मिळू शकते. मुंबई आणि कोकण पट्टा वगळता उर्वरित सर्वच भागांमध्ये आठवडाभर भाग बदलत पाऊस होण्याची शक्यता आहे. यात प्रामुख्याने काही भागांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गारपीट, काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. असे भारतीय हवामानशास्र विभागाने (आयएमडी) (Weather Update) आपल्या अंदाजात म्हटले आहे.

‘या’ जिल्ह्यांना आयएमडीचा इशारा (Weather Update Today 6 March 2024)

7 एप्रिल – वाशीम व यवतमाळ – ऑरेंज अलर्ट.
तर नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, बीड, अहमदनगर, औरंगाबाद, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार – यलो अलर्ट.

8 एप्रिल – अमरावती, वर्धा, चंद्रपूर – ऑरेंज अलर्ट.
तर नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, बीड, परभणी, हिंगोली, वाशीम, अकोला, बुलढाणा, जालना, अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव – यलो अलर्ट.

9 एप्रिल – नागपूर, भंडारा, अमरावती, अकोला, बुलढाणा, औरंगाबाद, जालना, अहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, पुणे – यलो अलर्ट.

हवेची चक्रीय स्थिती कार्यरत

हवामान विभागाच्या माहितीनुसार, सध्यस्थितीत दक्षिण तामिळनाडूपासून ते मध्य भारतातील विदर्भ, मराठवाडापट्ट्यापर्यंत कर्नाटकच्या भागावर हवेची चक्रीय स्थिती निर्माण (Weather Update) झाली आहे. हे चक्रीय वारे बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वारे खेचून घेत आहे. परिणामी, या वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यात कोकण किनारपट्टी वगळता विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग अशा सर्वच भागांमध्ये हा पाऊस पाहायला मिळणार आहे. असेही हवामान विभागाने आपल्या अंदाजात म्हटले आहे.

‘या’ राज्यांनाही इशारा

राज्यासोबतच हिमालयीन पट्टा, मध्यप्रदेश, ओरिसा, झारखंड, छत्तीसगड, आंध्रप्रदेश, तेलंगणा, केरळ, कर्नाटक या राज्यांची पश्चिम किनारपट्टी परिसरात देखील पावसाची शक्यता आहे. साधारणपणे पुढील पाच दिवस या राज्यांमध्ये पावसाचे वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. असेही हवामान विभागाने आपल्या अंदाजात म्हटले आहे. याशिवाय याच कालावधीत राज्यामध्ये तीव्र उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचेही हवामान विभागाने म्हटले आहे.

error: Content is protected !!