Weather Update : राज्यातील ‘या’ भागांमध्ये आज पावसाची शक्यता; तापमानातही वाढ होणार!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात पुढील 48 तासांत तापमानात वाढ (Weather Update) होण्याची शक्यता आहे. तर राज्यात काही भागात वादळी वारा, विजांचा कडकडाटासह अवकाळी पाऊस पडण्याची देखील शक्यता आहे. असे भारतीय हवामानशास्र विभागाने (आयएमडी) म्हटले आहे. राज्याचे कमाल तापमान हळूहळू कमी होण्यापूर्वी काही दिवस वाढण्याची अपेक्षा आहे. त्यामुळेच पुढील दोन दिवसात राज्यात तापमनात वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, किमान तापमान स्थिर (Weather Update) राहण्याचा अंदाज असल्याचेही हवामान विभागाने म्हटले आहे.

तापमान 2 ते 3 अंश सेल्सिअस वाढणार (Weather Update Today 7 May 2024)

राज्यात पुढील 48 तासात कमाल तापमानामध्ये वाढ होऊन त्यानंतर तापमान हळूहळू घसरण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने राज्यात सरासरी तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ (Weather Update) होऊ शकते. सोलापूर, लातूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तर मुंबई, पुण्यासह राज्याच्या काही भागात उष्ण, दमट हवामानाची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भात आजपासून (ता.7) पावसाची शक्यता आहे. प्रामुख्याने मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस होऊ शकतो. तसेच या कालावधीत ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. असेही हवामान विभागाने आपल्या अंदाजात म्हटले आहे.

‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज नांदेड, लातूर या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर धाराशिवमध्येही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. यासोबतच विदर्भात विजांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळेल. भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता असून, या भागात हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, मागील २४ तासांमध्ये राज्यातील सोलापूर, अकोला येथे ४४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर चंद्रपूर, वर्धा येथे ४४ अंश, तर गडचिरोली, परभणी, अमरावती, वाशीम आणि नागपूर येथे ४३ अंशांहून अधिक तापमानाची नोंद झाली आहे.

error: Content is protected !!