Weather Update : राज्यात 48 तासांत जोरदार पावसाची शक्यता; वाशिम जिल्ह्यात पावसाची हजेरी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : हवामान विभागाचा अंदाज (Weather Update) अगदी तंतोतंत खरा ठरला असून, रविवारी (ता.7) वाशीम जिल्ह्यातील काही भागांमध्ये पाऊस झाल्याचे वृत्त आहे. अशातच आता येत्या 48 तासांमध्ये राज्यात विदर्भातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. यामध्ये प्रामुख्याने नागपूर, गोंदिया, अमरावती अकोला या चार जिल्ह्यांना सोमवारी (ता.8) ऑरेंज अलर्ट असणार आहे. परिणामी, आज या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. असा अंदाज भारतीय हवामानशास्र विभागाकडून (आयएमडी) (Weather Update) व्यक्त करण्यात आला आहे.

‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट (Weather Update Today 8 April 2024)

भारतीय हवामानशास्र विभागाच्या (Weather Update) अंदाजानुसार, आज (ता.8) जळगाव, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, लातूर, नांदेड, धाराशिव, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, वाशिम, आणि यवतमाळमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अर्थात यातील काही जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो. तर काही भागांमध्ये पावसासह ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. असेही हवामान विभागाने आपल्या अंदाजात म्हटले आहे.

पाऊसासोबतच उकाडा कायम

दरम्यान, राज्यात पावसाचे वातावरण असले तरी उष्णतेची तीव्रता कायम (Weather Update) असून, अनेक भागांमध्ये उकाडा जाणवत आहे. मागील 24 तासांमध्ये राज्यातील सोलापूर व चंद्रपूर या ठिकाणी उच्चांकी 42.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. तर यवतमाळ 42, अकोला 41.5, वर्धा 41.4, वाशीम 41.4, परभणी 41, अमरावती 41, गडचिरोली 41 या जिल्ह्यांमध्ये 41 अंश सेल्सिअसहुन अधिक तापमान पाहायला मिळाले आहे. त्यामुळे पाऊसासोबतच राज्यात उकाडा कायम असून, काहीसे संमिश्र हवामान कायम आहे.

दरम्यान, मुंबईसह आसपासचा परिसर आणि संपूर्ण कोकणात निरभ्र आकाशासह कोरडे हवामान पाहायला मिळणार आहे. पूर्व महाराष्ट्रात पावसाचे वातावरण असले तरी कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये तापमानात काहीशी वाढ होण्याची शक्यता आहे. परिणामी, या भागांमध्ये उकाडा वाढण्याची शक्यता असल्याचेही हवामान विभागाने म्हटले आहे.

error: Content is protected !!