Weather Update : नाशिक जिल्ह्यातील अनेक भागांत पावसाची हजेरी; शेतकऱ्यांमध्ये धास्ती!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : हवामान विभागाने (Weather Update ) वर्तवलेल्या अंदाजानुसार, मागील 48 तासांमध्ये नाशिक जिल्ह्यातील काही ग्रामीण भागांमध्ये पावसाने हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. यात प्रामुख्याने सुरगाणा, दिंडोरी, चांदवड, मनमाड व येवल्याच्या काही भागांमध्ये हा पाऊस झाला असून, आज दिवसभर जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम होते. अचानक झालेल्या मोठ्या थेंबाच्या या पावसामुळे सोमवारी दिवसभर हवेत काहीसा गारवा निर्माण झाला होता. मात्र या पावसामुळे (Weather Update) द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी मोठी धास्ती घेतली आहे.

गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्हाच्या अनेक भागांमध्ये ढगाळ हवामान (Weather Update) कायम होते. त्यातच आता जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. यात मनमाड शहरा लगतच्या भागात तसेच येवला तालुक्यात ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम सरी बरसल्या आहे. तर चांदवडच्या काही भागांमध्येही जवळपास 15 मिनिटे चाललेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली होती. तर जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये सुरगाणा तालुक्यातील काही भाग, दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये पावसाने हजेरी लावली आहे. दिंडोरी तालुका मुख्यत्वे करून निफाडप्रमाणेच द्राक्ष पिकासाठी ओळखला जाणारा तालुका आहे. या भागात सध्या द्राक्ष घडांना पेपरने कव्हर लावण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे ऐन भरात असताना पावसाने हजेरी लावल्याने द्राक्ष पिकाचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दोन दिवस पावसाची शक्यता (Weather Update Today 8 Jan 2024)

दरम्यान, हवामान विभागाने पुढील दोन राज्यातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता कायम असल्याचे म्हटले आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, खानदेश आणि मराठवड्यातील काही भागात हलका पाऊस होऊ शकतो. राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या 30 ते 40 किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याचाही अंदाज आहे. तसेच पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो, असेही हवामान विभागाने आपल्या अंदाजात सांगितले आहे.

error: Content is protected !!