Weather Update : कोकणाला पावसाने झोडपले; अनेक भागांत मुसळधार पावसाची हजेरी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील तीन ते चार दिवसांमध्ये राज्यातील अनेक भागांमध्ये पाऊस (Weather Update) पाहायला मिळत आहे. आज मध्यरात्री कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. तर रायगड जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली आहे. अरबी समुद्रात एक कमी दाब पट्टा निर्माण झाला असून, परिणामस्वरूप कोकणातील अनेक भागांमध्ये पाऊस पाहायला मिळत आहे. त्यातच आज आणि उद्या राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता (Weather Update) असल्याचे भारतीय हवामानशास्र विभागाने (आयएमडी) म्हटले आहे.

आज मध्यरात्री रत्नागिरी जिल्ह्याच्या काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह (Weather Update) जवळपास अर्धा तास पाऊस झाला आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागातील वीज पुरवठा खंडीत झाला होता. जिल्ह्यातील चिपळूण, संगमेश्वर या तालुक्यांसह गुहागरमध्येही रिमझिम पावसाने हजेरी लावली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही आज पहाटे सर्वत्र अवकाळी पाऊस झाला. जिल्ह्यातील सावंतवाडी, कणकवली, दोडामार्ग या तालुक्यांना पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. त्यामुळे कोकणात सध्या ऐन फुलोऱ्याच्या अवस्थेत असलेल्या आंबा, काजू या पिकांना धोका निर्माण झाला आहे. या अवकाळी पावसामुळे किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असून, पिकांचा मोहोर गळून पडण्याची भीती निर्माण झाली आहे. रायगड जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली असून, महाड तालुक्यात आज सकाळपर्यंत रिमझिम पाऊस सुरूच असल्याचे पाहायला मिळाले आहे.

‘या’ राज्यांना पावसाचा इशारा (Weather Update Today 9 Jan 2024)

दरम्यान, देशातील विविध भागात आज मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, दक्षिण भारतामध्ये आज जोरदार पावसाची शक्यता असून, पुढील 24 तासात तमिळनाडूच्या किनारपट्टी भागात काही ठिकाणी मुसळधार होऊ शकतो. तर पूर्व राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, किनारी आणि दक्षिण कर्नाटकचा भाग, केरळ, लक्षद्वीपमध्येही गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. याशिवाय अंदमान आणि निकोबार बेटे, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि लडाख, गुजरातच्या काही भागांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

error: Content is protected !!