Weather Update : पुन्हा चक्रीय वाऱ्यांची स्थिती; 4 दिवस ‘या’ राज्यांमध्ये पावसाची शक्यता!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशातील हवामानात मोठा बदल (Weather Update) पाहायला मिळतोय. कधी पाऊस, कधी थंडी, कधी उन्हाचा चटका असे संमिश्र वातावरण सध्या अनुभवायला मिळत आहे. अशातच आता देशातील वायव्य भागात पुढील दोन दिवसांमध्ये पुन्हा एकदा दोन पश्चिमी वाऱ्यांचे झोत एका मागोमाग एक असे प्रवेश करणार आहे. ज्यामुळे उत्तरेकडील राज्यांमध्ये 11 ते 14 मार्च या कालावधीत पावसाची शक्यता आहे. तर काही हिमालयीन भागांमध्ये बर्फवृष्टी होऊ शकते. असा अंदाज भारतीय हवामानशास्र विभागाकडून (Weather Update) जारी करण्यात आला आहे.

‘या’ राज्यांना आयएमडी इशारा (Weather Update Today 9 March 2024)

देशात वायव्य सीमेवरून प्रवेश करणारे हे पश्चिमी वाऱ्यांचे झोत (Weather Update) प्रामुख्याने उत्तर अरबी समुद्राहुन येत आहेत. जे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या भूमीमार्गे उत्तर भारतीय राज्यांच्या दिशेने आर्द्रता युक्त हवा घेऊन येत आहे. यामुळे पुढील चार दिवस उत्तरेकडील राज्यांमध्ये पाऊस पाहायला मिळणार आहे. यामध्ये 10 ते 12 मार्च या कालावधीत उत्तराखंड या राज्यात हलक्या पावसासह बर्फवृष्टी होऊ शकते. तर 12 आणि 13 मार्च रोजी पंजाबमध्ये पावसाची शक्यता आहे. तर 13 मार्च रोजी हरियाणा, राजधानी दिल्लीसह पश्चिमी उत्तर प्रदेशात पाऊस होण्याची शक्यता आहे. याशिवाय या संपूर्ण 4 दिवसांच्या कालावधीत जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट-बलुचिस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये भाग बदलत पाऊस होण्याची शक्यता आहे. असेही हवामान विभागाने आपल्या अंदाजात म्हटले आहे.

महाराष्ट्रात काय आहे स्थिती?

या पश्चिमी वाऱ्यांच्या झोतामुळे महाराष्ट्रात पाऊस (Weather Update) आणि गारपिटीची कोणतीही शक्यता नसल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. मात्र, उत्तरेकडील राज्यांमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टी झाल्यानंतर महाराष्ट्रात पहाटेच्या थंडीत वाढ होऊ शकते, असेही हवामान विभागाने म्हटले आहे. मागील 24 तासांमध्ये महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे 10.2 अंश सेल्सिअस इतक्या निच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. तर सोलापूर या ठिकाणी राज्यातील उच्चांकी 38.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. तर विदर्भातील सर्वच जिल्हे आणि दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये पारा 35 अंशांच्या वर असल्याचे हवामान विभागाच्या आकडेवारीतून दिसून येत आहे. उर्वरित महाराष्ट्रात कमाल तापमान 35 अंशांच्या खाली आहे.

error: Content is protected !!