Weather Update : ‘मिचॉन्ग’ चक्रीवादळ धडकणार; महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांना इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यासह देशात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस (Weather Update) पाठ सोडत नसल्याने शेतकरी चिंतातुर झाले आहेत. त्यातच आता बंगालच्या उपसागरात पुन्हा एक तीव्र कमी दाब निर्माण झाला असून, या कमी दाबाचे पुढील 24 तासांत ‘मिचॉन्ग’ चक्रीवादळात (Weather Update) रूपांतर होणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. त्यामुळे 2 ते 4 डिसेंबर या काळात देशात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून, महाराष्ट्रातही त्याचा परिणाम पाहायला मिळणार असल्याचे भारतीय हवामानशास्र विभागाने (आयएमडी) म्हटले आहे.

दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागरात आणि दक्षिण अंदमान समुद्रात निर्माण झालेला हा तीव्र कमी दाब ‘मिचॉन्ग’ चक्रीवादळाचे रुप धारण (Weather Update) करणार आहे. साधारणपणे सोमवारी पहाटे पूर्व किनारपट्टीवर हे वादळ धडकण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे दक्षिण आंध्रप्रदेश आणि लगतच्या उत्तर तामिळनाडू किनारपट्टीला या चक्रीवादळाचा सर्वाधिक धोका असणार आहे. मात्र, त्याचा महाराष्ट्रातही परिणाम पाहायला मिळणार असून, या चक्रीवादळामुळे पुढील दोन दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाटासह वादळी पाऊस पडण्याचा अंदाज असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

या राज्यांना सर्वाधिक धोका (Weather Update Today 2 Dec 2023)

‘मिचॉन्ग’ चक्रीवादळामुळे तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकल किनारपट्टीवर ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तामिळनाडूतील चेंगलपट्टू, कांचीपुरम आणि तिरुवल्लूर जिल्ह्यात पुढील दोन दिवस जोरदार पाऊस होणयाची शक्यता आहे. 4 डिसेंबरपर्यंत उत्तर किनारपट्टीवरील तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये बहुतेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर 3 आणि 4 डिसेंबरला आंध्र प्रदेशात दक्षिण किनारपट्टी भागात अनेक ठिकाणी पाऊस पडू शकतो. असेही हवामान विभागाने म्हटले आहे. दरम्यान, या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे देशाच्या उत्तर भागात पावसाने हजेरी लावली आहे. चंदीगडमध्ये गुरुवारी सकाळीपासून जोरदार पाऊस आणि गारपीट झाल्याचे दिसून आले आहे, तर जम्मू काश्मीरमध्ये पावसासह बर्फवृष्टी सुरू आहे.

error: Content is protected !!