Weather Update : यंदाचा पावसाळा कसा राहणार? वाचा, अमेरिकी हवामान संस्था ‘नोआ’चा सुधारीत अंदाज!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : 2023 हे वर्ष अल-निनोच्या प्रभावामुळे (Weather Update) कमी पावसाचे राहिले. गेला महिनाभरात भारतीय हवामान विभागासह जगभरातील नामांकित सात हवामान संस्थांनी यंदाचा पावसाळा हा समाधानकारक राहणार असल्याचे म्हटले आहे. सर्वप्रथम 17 जानेवारी 2024 रोजी अल-निनो काढता पाय घेणार असल्याचे ‘नोआ’ या अमेरिकी हवामान संस्थेने म्हटले होते. तेव्हापासून नोआ ही हवामान संस्था सातत्याने अल-निनोच्या स्थितीवर लक्ष ठेवून आहे. अशातच आता 4 मार्च रोजी नोआने पुन्हा एकदा अल-निनोच्या स्थितीबाबत आपला सुधारित अंदाज जारी केला आहे. यात एप्रिलच्या अखेरीस अल-निनोचा प्रभाव कमी होणार असून, सर्वच भागांमध्ये यंदा चांगला पावसाळा (Weather Update) पाहायला मिळणार आहे. असे नोआने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.

शेतकऱ्यांना मोठा दिलासा (Weather Update Updated Forecast About El Nino)

अल-निनोच्या प्रभावामुळे (Weather Update) पाऊस कमी झाल्यास, शेतकऱ्यांना पिकांचे उत्पादन प्रभावित होण्याची भीती असते. त्यामुळे आता पुन्हा एकदा नोआने यंदाच्या पावसाळ्याबाबत शेतकऱ्यांना दिलासादायक माहिती दिली आहे. नोआने आपल्या सुधारित अंदाजात म्हटले आहे की, “प्रशांत महासागरात सध्या कार्यरत असलेला अल-निनोचा प्रभाव एप्रिलच्या शेवटीपर्यंत 79 टक्क्यापर्यंत कमी झालेला असेल. तर त्यापुढील जूनपर्यंतच्या काळापर्यंत तो पूर्णतः नाहीसा होईल. ज्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात अल-निनोचे संकट नसेल. परिणामी, 2023 च्या तुलनेत 2024 मध्ये मॉन्सूनचा पाऊस हा अधिक बरसणार आहे.”

अल-निनो काय आहे?

याआधी 1997-98 आणि 2015-16 मध्ये अल-निनोचा सर्वाधिक प्रभाव पाहायला मिळाला होता. अल-निनो म्हणजे काय तर प्रशांत महासागरातील पाण्याच्या पृष्ठभागावर तापमान वाढून, ती गरम हवा मैदानी भागात जमिनीकडे येते. ज्यामुळे ऋतूचक्र डिस्टर्ब होऊन, पावसाळा नेहमीपेक्षा खूप कमी प्रमाणात होतो. साधारणपणे अल-निनो कार्यरत असेल तेव्हा असे घडते. अल-निनोचा कार्यकाळ हा साधारणपणे 9 ते 12 महिन्याचा असतो. अर्थात मागील वर्षी जून 2023 मध्ये अल-निनोचा प्रभाव सुरु झाला होता. जो नोआच्या म्हणण्यानुसार एप्रिलच्या शेवटी 79 टक्के तर जूनपर्यंत पूर्णतः संपुष्टात येणार आहे.

साधारणपणे अल-निनोच्या प्रभावामुळे उत्तर आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकी देशांमध्ये चांगला पाऊस तर भारतीय उपखंडासह आशिया, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिकेत कमी पाऊस होतो. मात्र, मागील वर्षी कमी पाऊस झालेल्या सर्व भागांमध्ये यंदा चांगला पाऊस होणार आहे. असेही नोआने आपल्या अंदाजात म्हटले आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रासह देशातील शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

error: Content is protected !!