हॅलो कृषी ऑनलाईन : बंगालच्या उपसागरात भूवनेश्वर ते विशाखापट्टणम किनारपट्टीवर चक्राकार वाऱ्यांमुळे सौम्य कमी दाब क्षेत्र (Weather Update) तयार झाले आहे. ज्यामुळे राज्यात आजपासून पुढील दोन ते तीन दिवस पावसाची शक्यता आहे. राज्यात कोकण वगळता, पूर्व भागातील विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये, तर मराठवाड्यातील काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होऊ शकतो. तसेच राज्यातील काही भागांमध्ये 30 ते 40 किमी प्रति तास वेगाने वारे शकतात. असे भारतीय हवामान (Weather Update) विभागाने (आयएमडी) आपल्या अंदाजात म्हटले आहे.
‘या’ भागांना यलो अलर्ट (Weather Update Today 10 Feb 2024)
भारतीय हवामानशास्र विभागाच्या माहितीनुसार, विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या सर्वच जिल्ह्यांना तर मराठवाड्यातील जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. प्रामुख्याने शनिवारी संध्याकाळनंतर गडगडाटी वादळांसोबत विजांचा कडकडाट, हलका ते मध्यम पाऊस राज्यात होण्याची शक्यता आहे. यावेळी काही भागात जोरदार वारे वाहण्याची देखील शक्यता आहे. तसेच मराठवाड्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये देखील हलक्या स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. असेही हवामान विभागाने म्हटले आहे.
9th Feb: 10,11 फेब्रुवारी रोजी विदर्भा आणि मराठवाड्याच्या लगतच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह हलका ते हलका पाऊस पडण्याची शक्यता.
Possibility of thunderstorms with light to mod rainfall, lightning in parts of Vidarbha & adj areas of Marathwada on 10 & 11 Feb at isol places pic.twitter.com/opJw0F0tA2— K S Hosalikar (@Hosalikar_KS) February 9, 2024
धुळ्यात निच्चांकी 9.4 अंश तापमान
दरम्यान, सध्या राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार झाले असताना, धुळे या ठिकाणी किमान तापमानात घट दिसून आली आहे. धुळे येथे किमान तापमान 10 अंशांच्या खाली घसरले असून, 9.4 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले आहे. तर याउलट सोलापूर या ठिकाणी राज्यातील सर्वाधिक 37 अंश सेल्सिअस तापमानाचा उच्चांकी पारा कायम आहे. याशिवाय सांगली 35.1 आणि रत्नागिरी रत्नागिरी 35.0 या ठिकाणी देखील राज्यात मागील 24 तासांमध्ये 35 अंशांहून अधिक तापमान नोंदवले गेले आहे. उत्तर भारतीय राज्यांमध्ये मागील आठवड्यातील पावसानंतर थंडीत अल्प वाढ नोंदवली गेली आहे.