हॅलो कृषी ऑनलाईन : रब्बी हंगामातील गहू हे मुख्य पीक असून, यावर्षी देशासह राज्यातील काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात गहू पेरणी (Wheat Farming) झाली आहे. बऱ्याच ठिकाणी सध्या गहू पीक चांगलेच जोमात असून, चांगल्या ओंब्या लगडलेल्या आहेत. मात्र गहू पीक चांगले असले की गव्हाच्या वावरामध्ये उंदरांचा मोठा सुळसुळाट असतो. ज्यामुळे अनेक शेतकरी त्रस्त असतात. उंदरांचा बंदोबस्त करावा तरी कसा? असे अनेकदा शेतकरी विचारताना दिसतात. मात्र आज आम्ही तुम्हाला गव्हाच्या शेतामध्ये (Wheat Farming) उंदरांच्या त्रासापासून मुक्तता कशी मिळवायची? याबाबत प्रभावी उपाय सांगणार आहोत…
खाणे कमी नुकसानच अधिक (Wheat Farming Rats Infested)
थोड्याच दिवसांमध्ये ओंब्या भरणीला सुरुवात झाली की सर्वात चतुर प्राणी म्हणून ओळख असलेला उंदीर गहू पिकाला (Wheat Farming) त्रास देण्यास सुरुवात करू शकतो. उंदीर गहू खातो कमी मात्र गव्हाचे अर्ध्यात तुकडे करत असल्याने ओंब्या खाली गळून पडतात. ज्यामुळे शेतकऱ्यांना उंदरांचा बंदोबस्त करणे महत्वाचे ठरते. अन्यथा मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागते. विशेषतः उंदरांच्या चार प्रजाती आहेत. ज्या गहू पिकाला त्रास देत असतात. आणि त्यांचा प्रकोप हा मार्च-एप्रिलपर्यंत उशिरा पेरणी झालेल्या गहू पिकामध्ये सुद्धा पाहायला मिळतो.
कसा कराल उंदरांचा बंदोबस्त?
- सर्वप्रथम आपल्या गव्हाच्या शेतातील उंदरांच्या सर्व बिळांचा आढावा घ्या.
- या बिळांवर आपल्या घरगुती पिठाचे छोटे गोळे करून ठेवा. ज्यामुळे तुम्हाला उंदरांचा अधिवास लक्षात येण्यास मदत होईल.
- असे शक्यतो दोन किंवा तीन दिवस गव्हाच्या शेतात सर्व बिळांवर पीठ गोळे ठेवा.
- तुम्ही शेतातील सर्व बिळावर ठेवलेले पीठ गोळे दुसऱ्या दिवशी नाहीसे होत असेल तर उंदरांचे प्रमाण तुमच्या लक्षात येईल.
- त्यानंतर बाजारातुन झिंक फॉस्फाईडची पावडर विकत आणून, तिला पीठ गोळ्यात भरा. त्या गोळ्यांना खाद्यतेल लावा. जेणेकरून उंदरांना पावडरचा वास लक्षात येणार नाही.
- या गोळ्यांचा मोजून उपयोग करा. वापरानंतर उरलेली पावडर किंवा पीठ गोळे योग्य त्या पद्धतीने नष्ट करा.
- याशिवाय तुम्ही गव्हाच्या शेतात जागोजागी बिळांजवळ लाकूड उभे करून शकतात. जेणेकरून उंदरांची शिकार करणारे पक्षी त्या लाकडावर बसून उंदीर बाहेर येण्याची प्रतीक्षा करू शकतात. यामुळे पक्ष्यांना उंदराची शिकार करण्यास मदत होते.
- गहू पिकातून उंदरांचा सुळसुळाट पूर्णतः थाबंवण्यासाठी झिंक फॉस्फाईडची पावडर ही प्रभावी उपाय मानली जाते.
पीठ गोळे कसे बनवाल?
- बाजरी, गहू किंवा ज्वारी यापैकी कोणतेही पीठ घेऊन त्यात ही पावडर गोलाई देत आत भरावी.
- या पिठासाठी योग्य त्या प्रमाणात गरजेनुसार तेल वापरावे.
- याशिवाय तुम्ही झिंक फॉस्फाईड ऐवजी ब्रोमैडिओलोनची पावडर देखील वापरू शकतात.
- हे बनवलेले पीठ गोळे हे मुख्यतः शेतामध्ये कोरड्या जागेत ठेवावे.
- उंदीर ज्या ठिकाणी गहू पिकामध्ये बाहेर किंवा आत ये-जा करतात. अशा पिकातील मार्गांवर ठेवावे.