Wheat Fertilizer : गव्हासाठी वापरा ‘हे’ खत; दाणे भरण्यासह वाढेल उत्पादन!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या रब्बी हंगामातील गहू (Wheat Fertilizer) आणि हरभरा पिके ही चांगलीच जोमात आहेत. वाढलेली थंडी गहू पिकाला पोषक ठरत असून, तण काढणीनंतर तुम्हीही गव्हाला खते देण्याचा विचार करत असाल. तर इफको या कंपनीचे पोटॅशियम नायट्रेट (13-00-45) हे खत तुम्ही वापरू शकतात. या खताचा वापर गव्हाच्या भरदार दाण्यांसाठी महत्वपूर्ण ठरतो. तसेच उत्पन्नातही भरघोस वाढ होते. आज आपण पोटॅशियम नायट्रेट (Wheat Fertilizer) या खताच्या गहू पिकासाठीच्या वापराबाबत सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

पोटॅशियम नायट्रेट खादीबद्दल? (Wheat Fertilizer For Productivity Increase)

पोटॅशियम नायट्रेट (Wheat Fertilizer) हे खत पूर्णपणे पाण्यात विरघळते. या खतामध्ये 13 टक्के नायट्रोजन आणि 45 टक्के पोटॅशियमचे प्रमाण असते. कॅल्शियमचे प्रमाण अधिक असल्याने या खताच्या वापरातून गव्हाची ओंबी ही मोठी आणि दाणे भरदार होतात. हे खत गहू पिकाला पाण्याचा ताण पडल्यास किंवा अतिरिक्त पाणी दिले गेल्यास सुरक्षा रक्षक म्हणून काम करते. इतकेच नाही तर पोटॅशियम नायट्रेट हे खत गव्हासोबतच अन्य पिकांसाठी देखील महत्तवपूर्ण मानले गेले आहे. या खताच्या वापरामुळे गहू पिकाची रोग प्रतिकारशक्ती वाढण्याबरोबरच उत्पादन क्षमता देखील वाढते. या खताच्या वापराने गहू उत्पादन 20 टक्क्यांपासून ते 40 टक्क्यांपर्यंतचे वाढू शकते.

केव्हा करायचा वापर?

साधारणपणे राज्यातील गहू पीक हे सध्या तण, खुरपणीच्या अवस्थेत आहे. पोटॅशियम नायट्रेट या खताचा वापर प्रामुख्याने तुम्ही खुरपणी झाल्यानंतर लगेचच करावा. जेणेकरून या खताची मात्रा ही पीक मधल्या अवस्थेत आल्यानंतर आणि परिपक्व होईपर्यंत पूर्ण लागू होते. या खताचा वापर तुम्ही ठिबक पद्धतीने पाण्यातून करू शकतात. ठिबक पद्धतीने हे खत देताना प्रति लिटर पाण्यासाठी 1.5 ते 2.5 ग्रॅम खताचे प्रमाण ठेवणे गरजेचे असते. ठिबक व्यवस्था नसल्यास फवारणी पद्धतीने देखील हे खत तुम्ही गहू पिकाला देऊ शकतात. हे खत गहू पेरणीनंतर दोन महिन्यांच्या आत द्यावे.

पोटॅशियम नायट्रेटचे फायदे

  • गव्हाच्या फुटव्यांसाठी फायदेशीर असते.
  • गव्हाच्या मुळांची वाढ झपाट्याने होते.
  • गहू पिकाच्या पानांमध्ये हरितद्रव्यांची वाढ होऊन, उत्पादन वाढीस मदत होते.
  • गहू पिकाला रोग प्रतिकारशक्ती प्रदान करते.
  • गव्हाच्या दाण्यांमध्ये चमक येते.
  • दाण्यांच्या फुगवणीसाठी मदत करते.
  • गुणवत्तापूर्ण उत्पादन मिळते.
  • गहू पिकामध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण वाढण्यासाठी मदत होते.
  • पाण्याचा ताण पडल्यास, पिकाला ताण सहन करण्याची शक्ती प्रदान करते.
error: Content is protected !!