Wheat Harvesting : 30 मजुरांचे गहू सोंगणीचे काम; एकटी मशीन करते; वाचा किंमत, वैशिष्ट्ये?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षी राज्यात पावसाचे प्रमाण खूपच (Wheat Harvesting) कमी आहे. अशातही राज्यातील अनेक भागांमध्ये पाण्याची उपलब्धता पाहून, अनेक शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात गहू पेरणी केली होती. सध्याच्या घडीला काही ठिकाणी गहू सोंगणीला आला असून, त्यासाठी काही शेतकऱ्यांची रोजंदारीने मजुर पाहण्यासाठी लगबग सुरू आहे. मात्र, शेतकऱ्यांना शेतीतील कामासाठी मजूर न मिळणे. ही सर्वात मोठी समस्या आहे. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा मशीनबाबत सांगणार आहोत. जी मशीन दिवसाला 30 मजुरांचे गहू सोंगणीचे काम एकटी करते. या मशीनचे नाव रिपर मशीन असे आहे. विशेष म्हणजे सोंगणीसाठी शेतकऱ्यांना नेहमीच या मशीनची गरज पडू शकते. त्यामुळे तुम्ही देखील ही छोटेखानी मशीन खरेदी करून, स्वतःच्या गहू सोंगणीसह (Wheat Harvesting) दुसऱ्यांचे गहू देखील भाड्याने सोंगणीला घेऊ शकतात.

कुठे होतो या मशीनचा वापर? (Wheat Harvesting Machine)

सध्या गहू सोंगणीचा हंगाम सुरु आहे. त्यामुळे ही मशीन गहू सोंगणीसाठी (Wheat Harvesting) तर उपयुक्त आहेच. परंतु तुम्ही या मशीनचे ब्लेड बदलून गहू, मका, ज्वारी, बाजरी या सर्व पिकांची सोंगणी करू शकतात. आणि तुम्ही जर दुग्ध व्यवसाय करत असाल आणि दरवर्षी तुमच्या शेतात गहू पेरणी देखील करत असाल तर ही मशीन तुमच्यासाठी खूपच फायद्याची ठरणार आहे. कारण दुधाळ जनावरे जास्त असल्याने चारा कापणीसाठी शेतकऱ्यांचा शेतामध्ये खूप वेळ जातो. अशा वेळी देखील चारा कापणीसाठी शेतामध्ये ही मशीन खुप महत्वाची ठरणार असून, शेतकऱ्यांसाठी ही मशीन ऑल इन वन मानली जाते.

किती आहेत किंमत?

सध्या ट्रॅक्टरवर आधारित सोंगणी यंत्र, मोठी हार्वेस्टर देखील उपलब्ध आहेत. मात्र, या साधनांची गहू सोंगणीसाठीचे भाडे भरमसाठ आहे. ज्यामुळे छोट्या शेतकऱ्यांना हे भाडे परवडणारे नसल्याने अनेक कंपन्यांनी या छोटेखानी मानवचलित रिपर अर्थात छोट्या हार्वेस्टरची निर्मिती केलेली आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना एकाच वस्तूपासून अनेक कामे करण्यास मदत तर होतेच याशिवाय त्यांना मजूर न मिळण्याच्या समस्येपासून देखील दिलासा मिळतो. साधारणपणे बाजारात ही मशीन 15 ते 50 हजारांच्या दरम्यान आकार, गुणवत्तेनुसार उपलब्ध असल्याचे पाहायला मिळते. तुम्ही देखील आपल्या पसंती नुसार आणि गरजेनुसार मशीन खरेदी करू शकतात.

काय आहेत ‘या’ यंत्राची वैशिष्ट्ये?

  • 5 मजुरांचे एका दिवसाचे गहू सोंगणीचे काम ही मशीन केवळ 30 मिनिटात करते.
  • गहू कापणीनंतर सरळ रेषेत चूड ठेवते. गव्हाची विस्कटणी होत नाही.
  • अर्ध्या एकरासाठी 400 रुपये प्रमाणे 5 मजुरांचा 2000 हजार रुपये खर्च होतो. मात्र, या मशीनला खूपच कमी इंधन लागते. ज्यामुळे तुम्ही दुसऱ्यांचे गहू 1200 रूपये प्रति बिघा भाडे घेऊन देखील सोंगणी करू शकतात.
  • या मशीनला सर्वसाधारणपणे 50 सीसी क्षमतेचे 4 स्ट्रोक इंजिन पाहायला मिळते.
  • या मशीनला एक बिघा गहू सोंगणीसाठी अर्धा लिटर डिझेल लागते.
  • ज्यामुळे तुम्ही प्रति बिघा 1000 रुपये सहज कमवू शकतात.
error: Content is protected !!