Wheat Harvesting: गव्हाची काढणी करताना लक्षात ठेवा या गोष्टी, होणार नाही नुकसान!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या गहू उत्पादक राज्यात गव्हाची काढणी (Wheat Harvesting) सुरू आहे.एप्रिल महिन्यात शेतकरी गव्हाची काढणी करतात. अनेक ठिकाणी गव्हाची काढणी सुरू झाली आहे, तर काही ठिकाणी काढणीची प्रतीक्षा सुरू आहे. उशिरा काढणी केल्यास या वेळी गव्हाचे अधिक उत्पादन (Wheat Production) मिळू शकते, असा विश्वास शेतकर्‍यांनी व्यक्त केला. IARI दिल्लीच्या कृषी शास्त्रज्ञांनी (Agriculture Expert) गव्हाची लागवड करणाऱ्या शेतकर्‍यांसाठी गहू कापणीच्या संदर्भात महत्त्वाचा सल्ला दिला आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना गहू काढणीचा (Wheat Harvesting) अधिक फायदा मिळू शकेल. जाणून घेऊ याविषयी.

  • गहू कापणीच्या संदर्भात पुसा शास्त्रज्ञाने प्रसिद्ध केलेला सल्ला मध्ये त्यांनी असे सांगितले आहे की शेतकर्‍यांनी सकाळची वेळ गहू काढणीसाठी सर्वात योग्य वेळ (Wheat Harvesting Time) आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सकाळी गव्हाची काढणी करावी.
  • गव्हाची कापणी (Wheat Harvesting) हाताने केली जात असेल तर पिकाचा गुंडाळा 3 ते 4 दिवस शेतातच सोडावा जेणेकरून ते सूर्यप्रकाशात सुकल्यांनंतर त्यातील ओलावा कमी होईल.
  • शेतकऱ्यांनी एप्रिल अखेरपर्यंत सर्व प्रकारच्या गव्हाची कापणी करावी.
  • ज्या शेतकऱ्यांना विळी किंवा कापणी यंत्राच्या (Wheat Harvesting Machine) साहाय्याने गव्हाचे पीक काढायचे आहे त्यांनी हे लक्षात ठेवावे की कापणी करताना गव्हाचे पीक पृष्ठभागापासून 4 ते 5 सें.मी. उंचीवर कापावे.
  • पीक कापताना दाण्याचा आवाज येत असेल तर समजून घ्या की पीक काढणीसाठी पूर्णपणे तयार आहे. या पद्धती द्वारे पीक काढणीसाठी तयार आहे की नाही हे शेतकरी (Farmer) सहजपणे ओळखू शकतात.
  • काढणी दरम्यान धान्यातील ओलावा 15 ते 20 टक्क्यांपेक्षा जास्त नसावा.
  • काढणीच्या वेळी बियाण्यातील ओलावा (Seed Moisture) कुठेही जास्त दिसला तर ते शेतात सोडून सुमारे चार ते पाच दिवस वाळू द्यावे. ते पूर्णपणे वाळल्यानंतरच मळणी (Wheat Threshing) करावी.

पिकांची कापणी उशीरा केल्यास त्याचा पिकाच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. याशिवाय पक्षी आणि उंदरांमुळेही पिकाचे नुकसान होऊ शकते त्यामुळे लवकरात लवकर गव्हाची कापणी (Wheat Harvesting) करावी.

error: Content is protected !!