Wheat Maize Export: गहू, मका निर्यातीत मोठी घट; वाचा किती झाली निर्यात?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : 2023 यावर्षीच्या पहिल्या सात महिन्यांमध्ये (एप्रिल ते ऑक्टोबर 2023) गहू आणि मका निर्यातीत (Wheat Maize export) मोठी घट नोंदवली गेली आहे. या सात महिन्यांच्या कालावधीत देशातील गहू निर्यातीत 98.44 टक्क्यांनी घट नोंदवली गेली आहे. तर मका निर्यातीतही (Wheat Maize export) या काळात 29 टक्क्यांनी घसरण नोंदवली गेली आहे. केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या अन्न आणि कृषी प्रक्रियाकृत निर्यात विकास प्राधिकरणाच्या (एपीडा) आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे.

केवळ 79 हजार टन गहू निर्यात (Wheat Maize Export Decreased)

केंद्र सरकारने मे 2023पासून गहू निर्यातीवर (Wheat Maize export) पूर्णतः बंदी घातली आहे. केवळ सरकारी पातळीवरून मर्यादित स्वरूपात या काळात सरकारकडून गहू निर्यात करण्यात आली आहे. एपीडाच्या आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑक्टोबर 2023 या कालावधीमध्ये देशातून केवळ 79 हजार टन गहू निर्यात होऊ शकली आहे. जी मागील वर्षी याच कालावधीत 46.56 लाख टन इतकी नोंदवली गेली होती. यावर्षी निर्यात झालेल्या गव्हातून 2.30 कोटी डॉलरचे परकीय चलन देशाला मिळाले आहे. जे मागील वर्षी याच कालावधीत 156.70 डॉलर इतके मिळाले होते. अर्थात परकीय मूल्याच्या दृष्टीने विचार करता देशातील गहू निर्यातीत 98.44 टक्क्यांनी घट नोंदवली गेली आहे.

मका निर्यातीत 3 लाख टनांनी घट (Decrease In Maize Export)

मका निर्यातीवर केंद्र सरकारने कोणतेही निर्बंध लादलेले नाहीत. मका निर्यातीवर (Wheat Maize export) लावण्यात आलेले निर्यात मूल्य आणि आयातदार देशांमध्ये मागणी नसल्यामुळे मका निर्यातीत घट झाल्याचे समोर आले आहे. एपीडाच्या आकडेवारीनुसार, एप्रिल ते ऑक्टोबर या पहिल्या सहा महिन्यांच्या काळात देशात भरडधान्यांच्या मुख्यतः मकाची निर्यात ही 13.58 लाख टन इतकी नोंदवली गेली आहे. जी मागील वर्षी याच कालावधीमध्ये 16.59 लाख टन इतकी नोंदवली गेली होती. अर्थात या सहा महिन्यांच्या कालावधीत देशातील मका निर्यातीत 3 लाख टनांनी घट नोंदवली गेली आहे. तर निर्यात मूल्याचा विचार करता पहिल्या सहा महिन्यांमध्ये 40.40 कोटी डॉलरची मका निर्यात होऊ शकली आहे. जी मागील वर्षी याच कालावधीत 57 कोटी डॉलर इतकी नोंदवली गेली होती.

गव्हाचा दर देशांतर्गत बाजारात तेजीत असल्याने भविष्यात गव्हाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारकडून व्यापारिक गहू निर्यातीला परवानगी मिळण्याची शक्यता ही खूपच कमी आहे. तर मकाचा विचार केल्यास, मकाचे खरिपातील उत्पन्न आणि रब्बी हंगामात मका लागवड सुरु असल्याने त्यातून काही प्रमाणात मका पुरवठा संतुलित राहणार असल्याचे बोलले जात आहे.

error: Content is protected !!