Wheat Price : यावर्षीही गहू दरात तेजी राहणार; ‘ही’ आहेत दरातील तेजीची कारणे!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील सध्याच्या गहू साठा, सध्याचे गहू दर (Wheat Price) पाहता यावर्षी देखील वर्षभर गव्हाचे दर तेजीत राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे यावर्षी देशातील सरकारी गहू खरेदी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा वर्षभर गहू दरातील तेजी बळ मिळण्याची शक्यता अधिक असणार आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात सध्या बाजारात गव्हाला सरासरी 30.88 रुपये प्रति किलो इतका दर मिळत आहे. यामध्ये देशभरातील बाजाराचा विचार करता सध्या कमाल 54 रुपये, किमान 21 रुपये प्रति किलो दर मिळत आहे. तर यंदाच्या रब्बी हंगामासाठी केंद्र सरकारने गहू पिकासाठी 2275 रुपये प्रति क्विंटल इतका हमीभाव (Wheat Price) निर्धारित केला आहे.

ई-नामवर किती मिळतोय दर? (Wheat Price Continue To Rise This Year)

केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी उभारलेल्या ऑनलाइन ट्रेडिंग प्लेटफार्म राष्ट्रीय कृषि बाजार (E-NAM) वर सध्या देशभरातील बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना कमीत कमी 2,500 रुपये प्रति क्विंटलच्या वरती दर मिळत आहे. अर्थात मागील वर्षभरापासून गहू दरात (Wheat Price) घट न होता स्थिरता किंवा मग त्यापेक्षा दर हेच समीकरण पाहायला मिळाले आहे. अर्थात यावर्षीची नवीन गहू खरेदी सुरु झालेली असताना देखील गहू दर कमी झालेले नाही. सरकारने प्रति क्विंटल 2275 रुपये प्रति क्विंटल निर्धारित केलेल्या दरापेक्षा गव्हाचे भाव अधिक आहे. त्यामुळे आता एकूणच परिस्थिती आगामी वर्षभर गहू बाजारात तेजी कायम राहणार आहे. असे संकेत गहू बाजारातील जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे.

किरकोळ बाजारातील दर

राजधानी दिल्लीतील किरकोळ बाजारात सध्या गव्हाला 29 रुपये प्रति किलो दर मिळत आहे. तर गुजरात 40 रुपये प्रति किलो, मध्यप्रदेश 28.25 रुपये, महाराष्ट्र 39.47 रुपये प्रति किलो दर गव्हाला मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर हरियाणा या गहू उत्पादक राज्यात सध्या किरकोळ बाजारात गहू 26 रुपये प्रति किलो इतके आहेत. अर्थात देशातील सर्वच बाजार समित्यांमध्ये आणि किरकोळ बाजारात सध्या गहू दर (Wheat Price) हे हमीभावापेक्षा अधिक आहे. त्यामुळे शेतकरी सरकारी गहू खरेदीऐवजी यंदा खासगी क्षेत्रातील पक्रियाकृत कंपन्यांना आपला गहू विक्री करतील. याशिवाय बाजार समित्यांमध्ये हमीभावापेक्षा अधिक दर मिळत असल्याने तो मार्ग त्यांच्यासाठी केव्हाही मोकळा आहे. परिणामी, यंदा देशातील सरकारी गहू खरेदी कमी होण्याची शक्यता आहे.

सरकारी गहू खरेदी कमी होणार?

मागील वर्षी केंद्र सरकारने 341.5 लाख टन गहू खरेदीचे लक्ष्य निर्धारित केले होते. मात्र, केंद्र सरकारला मागील वर्षी केवळ 341.5 लाख टन गहू खरेदी करण्यात यश मिळाले होते. त्याचप्रमाणे केंद्र सरकारने यावर्षीच्या हंगामात 320 लाख टन गहू खरेदीचे लक्ष्य निर्धारित केले आहे. एकूणच बाजारातील परिस्थिती पाहता केंद्र सरकारला 320 लाख टन गहू खरेदी करणे शक्य होणार नाही. कारण शेतकऱ्यांना बाहेर अधिक दर मिळत असल्याने, शेतकरी कमी दरात गहू विक्री का करतील? या प्रश्न उपस्थित होतो.

error: Content is protected !!