Wheat Production : ‘या’ राज्यात यंदा विक्रमी गहू उत्पादन होणार; बाजारात आवक वाढली!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील गहू काढणी (Wheat Production) हंगाम सध्या जोरात सुरु असून, यंदा चांगले उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. प्रामुख्याने रब्बी हंगामाच्या सुरुवातीपासून यावर्षी टप्प्याटप्प्याने पाऊस होत राहिला. ज्यामुळे त्याचा गहू पिकाला फायदा झाला. याशिवाय यंदा गहू पिकाला आवश्यक असणारी कडाक्याची थंडी देखील संपूर्ण हंगामात कायम होती. ज्यामुळे यंदाच्या रब्बी हंगामातील वातावरण गहू पिकाच्या पथ्यावर पडले आहे. अशातच आता देशातील आघाडीचे गहू उत्पादक राज्य असलेल्या पंजाबमध्ये यंदा विक्रमी गहू उत्पादन (Wheat Production) होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

काय आहे उत्पादनवाढीमागील कारण? (Wheat Production Record In Punjab)

पंजाब या राज्यामध्ये सरकारी गहू खरेदी (Wheat Production) 1 एप्रिल पासून सुरु झाली असून, राज्यातील जवळपास 1,307 बाजार समित्यांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात गव्हाची आवक सुरु झाली आहे. साधारणपणे पंजाबमध्ये मार्च महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात बाजार समित्यांमध्ये गव्हाची आवक होण्यास सुरुवात होते. मात्र, यंदा गहू आवक काहीशी उशिराने सुरु झाली आहे. अर्थात गहू पिकाने परिपक्वतेसाठी वेळ घेतल्याचे पंजाब कृषी विद्यापीठाचे कुलगुरू एस. एस. गोसल यांनी म्हटले आहे. यंदाचे थंड हवामान आणि उशिराने होणारी काढणी हे गहू उत्पादन नेहमीपेक्षा अधिक होण्याचे संकेत असून, आतापर्यंतचा राज्याचा 182.57 लाख टन उत्पादनाचा आकडा पार होण्याची शक्यता आहे. असेही त्यांनी म्हटले आहे.

5 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडणार

एस. एस. गोसल यांनी म्हटले आहे की, यंदा गव्हाला आवश्यक असणारे थंड हवामान मिळाले. ज्यामुळे गहू पिकाचा दाणे भरण्याचा कालावधी लांबला. पंजाबमध्ये 2018-19 मध्ये आतापर्यंतचे 182.57 लाख टन इतके विक्रमी गहू उत्पादन नोंदवले गेले होते. हा विक्रमी उत्पादनाचा आकडा यंदा पार होण्याची शक्यता आहे. तसेच त्यावेळी 2018-19 मध्ये शेतकऱ्यांना 51.88 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन मिळवण्यात शेतकऱ्यांना यश मिळाले होते. यावर्षी तुलनेने प्रति हेक्टर उत्पादनात देखील वाढ होण्याची शक्यता आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!