Wheat Production : जगाची नजर भारतीय शेतकऱ्यांकडे; वाचा नेमकं कारण काय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या देशासह जगातील गहू साठा जसजसा कमी होत आहे. तशीतशी भारतासह पंजाबमधील गहू पिकावर (Wheat Production) जगाची नजर वळायला सुरुवात झाली आहे. पंजाब हे गहू उत्पादन करणारे आघाडीचे राज्य असून, यावर्षीही त्या ठिकाणी देशातील सर्वाधिक गहू पेरणी झाली आहे. सध्या पडत असलेल्या कडाक्याच्या थंडीसह अनुकूल वातावरणामुळे पंजाबमध्ये चांगले गहू उत्पादन होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. याउलट यंदा एल निनोमुळे अमेरिका, ऑस्ट्रेलियासह अनेक देशांमधील गहू उत्पादन घटणार आहे. त्यामुळे आता या देशांमधील अन्नधान्य महामंडळे देखील भारतीय गहू उत्पादक (Wheat Production) शेतकऱ्यांकडे आशेने पाहत असल्याचे पंजाब सरकारच्या कृषी विभागातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने म्हटले आहे.

गहू साठ्यात घट (Wheat Production Reduced)

भारतीय अन्नधान्य महामंडळाच्या आकडेवारीनुसार, सध्या देशात 163.50 लाख टन इतका गहू साठा (Wheat Production) शिल्लक आहे. जो 2017 नंतरचा सर्वात कमी गहू साठा आहे. त्यामुळे यावर्षी देशात गव्हाची कमतरता भासू शकते. अमेरिका, ऑस्ट्रेलिया या जागतिक पातळीवर सर्वाधिक गहू उत्पादन करणाऱ्या देशांमध्ये गहू पिकाबाबत नकारात्मक सूर पाहायला मिळत असून, त्या ठिकाणी यावर्षी गहू उत्पादन घटणार असल्याचे बोलले जात आहे. परिणामी यावर्षी पंजाब या राज्यात गहू पिकावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये. यासाठी कृषी विभागाकडून विशेष काळजी घेतली जात आहे. जागतिक गहू उत्पादन घटत असताना, पंजाबसह भारतीय शेतकऱ्यांना गहू पिकाबाबत नेतृत्व करत, अधिक उत्पादन घेण्याची संधी असल्याचे म्हणत या अधिकाऱ्याने राज्याच्या कृषी विभागाकडून गहू पिकाकडे विशेष लक्ष केंद्रित करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.

विक्रमी उत्पादनाची अपेक्षा

पंजाब सरकारच्या कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार, यावर्षी राज्यात 34.80 लाख हेक्टर क्षेत्रावर विक्रमी गहू पेरणी झाली आहे. जी मागील वर्षी याच कालावधीत 35.08 लाख हेक्टरवर नोंदवले गेली होती. मागील वर्षी पंजाबमध्ये 164.75 लाख टन गव्हाचे उत्पादन नोंदवले गेले होते. दरम्यान, यंदा पेरणीत अल्प घट नोंदवली गेली असली तरी कृषी विभागाला यावर्षी विक्रमी गहू उत्पादनाची अपेक्षा असल्याचेही या अधिकाऱ्याने म्हटले आहे. मागील वर्षी पंजाबमध्ये प्रति हेक्टर 4,696 किलो गहू उत्पादन नोंदवले गेले होते. यावर्षी पंजाबमध्ये गहू पिकाला अनुकूल अशी थंडी पडत आहे. सध्या तरी पंजाबसह उत्तरेकडील कोणत्याही राज्यांमध्ये तांबेरा रोगाच्या प्रादुर्भावाची माहिती समोर आली नसल्याचेही या अधिकाऱ्याने म्हटले आहे.

error: Content is protected !!