हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील गहू उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जवळपास सर्वच बाजार समित्यांमध्ये गहू दरात (Wheat Rate) मोठी वाढ नोंदवली गेली आहे.प्रमुख बाजार समिती असलेल्या लासलगाव बाजार समितीत गव्हाला सध्या कमाल 3299 ते किमान 2400 तर सरासरी 2851 रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. मात्र, यावर्षी पाण्याच्या कमततेमुळे अनेक शेतकऱ्यांनी गहू पेरणी केली नसल्याने, या दरवाढीचा (Wheat Rate) फायदा शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांनाच अधिक होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
उत्पादक क्षेत्रातच अधिक भाव (Wheat Rate Increase In Maharashtra)
याशिवाय विंचूर येथील बाजार समितीत देखील गव्हाचे दर कमाल 2800 ते किमान 2450 रुपये तर सरासरी 2600 रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहचले आहे. तर जालना जिल्ह्यातील अंबड बाजार समितीत सध्या कमाल 3200 ते किमान 1900 रुपये तर सरासरी 2000 रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. धुळे बाजार समितीत सध्या कमाल 3265 ते किमान 2340 रुपये तर सरासरी 2850 रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. अर्थात गहू उत्पादक क्षेत्रातील बाजार समित्यांमध्येच गहू दर (Wheat Rate) वाढल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे याचा पाण्याचे योग्य नियोजन करून, यंदा गहू पीक घेतलेल्या शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार आहे.
यंदा पेरणी क्षेत्र घटले
महाराष्ट्रात यावर्षी दुष्काळाची परिस्थिती आहे. खरिपातील पिके घेतानाच शेतकऱ्यांची पाण्यासाठी ओढताण झाली. त्यामुळे रब्बी हंगामातील गहू पीक कसे काढणार? असे प्रश्न शेतकऱ्यांसमोर होता. परिणामी या वर्षी राज्यात देशातील एकूण गहू पेरणीपैकी केवळ २ टक्के पेरणी झाल्याचे आकडेवारीतुन स्पष्ट होत आहे. परिणामी आता गव्हाच्या दराने हळूहळू उसळी घेण्यास सुरुवात केली आहे. व्यापार विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार, सध्याच्या घडीला देशातील सर्वच भागांमध्ये गव्हाचे दर हे हमीभावापेक्षा अधिक आहेत. मात्र मागील काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील गहू दर ३००० हजार रुपये प्रति क्विंटलच्या वरती पोहचले आहेत.
केव्हापासून झाली दरवाढ
2022 पासून जगभरातील अनेक देशांमध्ये गहू दरात होत आहे. रशिया-युक्रेन युद्धानंतर भारताने विक्रमी गहू निर्यात करत, मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळवले होते. मात्र, २०२२ नंतर केंद्र सरकारकडून सातत्याने गहू निर्यातीवर निर्बंध लादण्याचे धोरण अवलंबण्यात आले. मात्र तरीही या काळात शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा अधिक दर मिळून फायदाच झाला आहे. अशातच आता पुन्हा एकदा राज्यातील गहू दर उसळी घेत असल्याने, याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.