Wheat Rate: महाराष्ट्रात गव्हाला विक्रमी दर! जाणून घ्या प्रति क्विंटल दर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या गव्हाच्या दरात (Wheat Rate) दिवसेंदिवस वाढ होत आहे. गव्हाच्या किंमतीत विक्रमी वाढ झाली असून, सध्या प्रति क्विंटल गव्हाला 2500 ते 3900 रुपयांचा दर (Wheat Rate)मिळत आहे.

त्यामुळे राज्यातील गहू उत्पादक (Wheat Farmers) शेतकऱ्यांसाठी दिलासादायक परिस्थिती आहे. गव्हाच्या विक्रमी दर वाढीमुळे गहू उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होत आहे. सरकारी हमीभावाचा (MSP) विचार केला तर त्यापेक्षा बाजारात गहू 25 ते 30 टक्के अधिक दराने विकला जात आहे.

प्रति क्विंटल गव्हाला सरासरी 3450 रुपये दर (Wheat Rate)

अनेक बाजार समित्यांमध्ये गव्हाला सरासरी 3450 रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळत आहे. तर सरकारने चालू वर्षासाठी गव्हाचा एमएसपी 2275 रुपये ठेवला आहे. देशातील अनेक राज्यात गव्हाची खरेदी सुरु झालीय. अशातच गव्हाच्या दरात वाढ होत असल्यानं शेतकऱ्यांना फायदा मिळतोय. 

राज्यात का वाढतायेत गव्हाच्या किंमती?

महाराष्ट्रात यावर्षी गव्हाचे पेरणी क्षेत्र (Sowing Area) घटले होते. त्यामुळे देशातील एकूण उत्पादनापैकी राज्यात फक्त 2 टक्केच गव्हाचं उत्पादन (Wheat Production) मिळाले, यासर्वाचा एकत्रित परिणाम म्हणजे गव्हाच्या किंमतीत झालेली वाढ. एमएसपीपेक्षा सध्या गव्हाचे दर (Wheat Rate) अधिक असल्यामुळे शेतकरी एमएसपीवर गव्हाची विक्री करण्यापेक्षा थेट बाजारात चढ्या किमतीत विक्री करत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना चांगला फायदा होत आहे.

राज्यातील अनेक शेतकऱ्यांचा कल गहू लागवडीकडे

एका बाजूला गव्हाचे दर वाढतायेत, तर दुसऱ्या बाजूला कांद्याचे दर घसरतायेत. त्यामुळं अनेक शेतकरी कांद्याची शेती सोडून गव्हाची शेती करत आहेत. गव्हाच्या पिकाकडे शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसतोय. कारण सध्या गव्हाला अपेक्षीत दर मिळत आहे. 

 गव्हाला हवामानाचा मोठा फटका 

मागील वर्षी पावसाचं प्रमाण कमी होतं. त्यामुळं अनेक ठिकाणच्या शेतकऱ्यांकडे गव्हाची लागवड करायला देखील पैसे नव्हते. तर काही शेतकऱ्यांनी लावलेल्या गव्हाला हवामानाचा मोठा फटका बसला. या दोन्ही गोष्टीचा गव्हाच्या उत्पादनावर मोठा परिणाम झालाय. सध्या गव्हाचे उत्पादन घटले आणि मागणीत वाढ झालीय. त्यामुळं दरात वाढ (Wheat Rate) होताना दिसतेय.

ही सर्व परिस्थिती बघता शेतकरी बंधूंनी, हवामानाचा अंदाज, बाजाराचा कल, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून पीक नियोजन करावे.

error: Content is protected !!