Wheat Rate : गहू साठ्यात घट होण्याची शक्यता; आगामी काळात तेजीचे संकेत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : जागतिक गहू साठ्यात (Wheat Rate) घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 2023-24 या वर्षात जगाच्या गहू मागणीत (Wheat Rate) मागील वर्षीच्या तुलनेत 90 लाख टनांनी वाढ होऊन, ती 80.40 कोटी टन इतकी नोंदवली जाण्याची शक्यता आहे. मात्र याउलट गव्हाच्या जागतिक उत्पादनात यावर्षी 70 लाख टनांनी घट होऊन, ते 78.70 कोटी टन इतके होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे यंदा मागणीच्या तुलनेत उत्पादन कमी होणार असल्याने जागतिक गहू साठ्यात घट होणार असल्याचे बोलले जात आहे.

जाणकारांच्या म्हणण्यानुसार, “वैश्विक गहू साठ्यात यावर्षी 1.70 कोटी टनांची घसरण (Wheat Rate) होण्याची शक्यता आहे. ही मागील 12 वर्षातील सर्वात मोठी घसरण आहे. मागील वर्षीच्या तुलनेत प्रामुख्याने कॅनडा, रशिया आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये गहू उत्पादन घटणार असल्याने त्याचा वैश्विक गहू उत्पादनावर परिणाम होऊन, घट नोंदवली जाणार आहे. त्यामुळे सध्यस्थिती अशी निर्माण होत आहे की, जागतिक गहू मागणीत मोठी वाढ होऊन, उत्पादन मात्र काहीसे घटणार आहे. परिणामी मागणी आणि पुरवठ्याचे गणित बिघडून गहू दरात जटिलता निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात गहू दरात तेजी पाहायला मिळू शकते.”

तेजीस बळ मिळणार (Wheat Rate In Global Market)

दरम्यान, चीन, भारतासारख्या देशांकडे गव्हाचा मुबलक साठा असणार आहे. मात्र या दोन देशांकडून निर्यातीला कोणताही वाव नसणार आहे. रशिया, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, कॅनडा, फ्रांस, युक्रेन, अर्जेंटिना आणि जर्मनी हे प्रमुख निर्यातदार देश आहेत. मात्र यातील काही देशांमध्ये गहू उत्पादनात घट होणार आहे. त्यामुळे गहू दरातील तेजीस बळ मिळण्याची दाट शक्यता आहे.

अन्नटंचाईची परिस्थिती नाही

असे असले तरी जागतिक मागणीच्या तुलनेत एकूण गहू साठ्यापेक्षा राखीव गहू साठा हा 26.40 कोटी टनांनी अधिक असेल. त्यामुळे अन्नटंचाईसारखी परिस्थिती उद्भवणार नाही. मात्र, प्रमुख निर्यातदार देशांमधील राखीव साठा हा 70 लाख टनांनी घटणार असून, तो 5.80 कोटी टनांपर्यंत खाली येणार आहे. त्यामुळे वैश्विक बाजारात गव्हाच्या दरात वाढ होण्यास मदत होणार आहे.

error: Content is protected !!