Wheat Sowing : उत्तरेकडील राज्यांमध्ये गहू पेरणीला वेग; आतापर्यंत १४२ लाख हेक्टरवर पेरणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षीच्या रब्बी हंगामात गहू लागवडीत (Wheat Sowing) आतापर्यंत 5 टक्क्यांनी घट नोंदवली गेली आहे. 24 नोव्हेंबरपर्यंत देशात 142 लाख हेक्टरवर गहू लागवड झाली आहे. जी मागील वर्षी याच कालावधीत 149 लाख हेक्टरवर (Wheat Sowing) झाली होती. अर्थात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा गहू लागवडीखालील क्षेत्रात 7 लाख हेक्टरने घट झाली आहे. अशी माहिती सरकारी आकडेवारीतून समोर आली आहे.

राज्यनिहाय पेरणीची आकडेवारी सरकारकडून जाहीर करण्यात आली असून, उत्तरप्रदेशात आतापर्यंत सर्वाधिक 36.46 लाख हेक्टरवर गहू पेरणी (Wheat Sowing) झाली आहे. जी मागील वर्षी याच कालावधीत 35.68 लाख हेक्टरवर नोंदवली गेली होती. अर्थात यावर्षी युपीतील गहू पेरणीच्या क्षेत्रात मागील वर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे. याचप्रमाणे मध्यप्रदेशात यावर्षी 42.20 लाख हेक्टरवर गहू पेरणी झाली आहे. जी मागील वर्षी याच कालावधीत 44.33 लाख हेक्टरवर होऊ शकली होती. मध्यप्रदेशातही गहू लागवडीखालील क्षेत्रात मागील वर्षीच्या तुलनेत 2.13 लाख हेक्टरने वाढ झाली आहे.

पंजाब, हरियाणा पिछाडीवर (Wheat Sowing In India)

मात्र असे असले तरी पंजाब आणि हरियाणा या राज्यांमध्ये गहू पेरणीत काहीशी घट पाहायला मिळत आहे. पंजाबमध्ये आतापर्यंत 28.11 लाख हेक्टरवर गहू पेरणी झाली आहे. जी मागील वर्षी याच कालावधीत झालेल्या पेरणीच्या तुलनेत 1.90 लाख हेक्टरने कमी आहे. हरियाणामध्ये आतापर्यंत 10.80 लाख हेक्टरवर गहू पेरणी झाली आहे. जी मागील वर्षीच्या तुलनेत 1.80 लाख हेक्टरने कमी आहे. राजस्थानमध्ये 14.30 लाख हेक्टरवर गहू पेरणी झाली आहे. जी मागील वर्षीच्या तुलनेत 4.70 लाख हेक्टरने घटली आहे.

दरम्यान, येत्या काही दिवसांमध्ये उन्हाची तीव्रता वाढणार असल्याने जमिनीतील ओलावा कमी होऊन पेरणीत अडथळा येऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर गव्हाची पेरणी करावी, असे आवाहन सरकारी पातळीवरून करण्यात येत आहे. सद्यस्थितीत अनेक राज्यांमध्ये पावसाने हजेरी लावल्याने गहू पेरणीस अनुकूल वातावरण तयार झाले आहे. उत्पादनवाढीसाठी पेरणीचा हा काळ अनुकूल असून, उशिरा पेरणी झालेल्या गव्हाला उष्णतेचा फटका बसू शकतो. त्यामुळे उपलब्ध ओलाव्यावर तत्काळ पेरणी करावी, असे आवाहनही सरकारी पातळीवरून केले जात आहे.

error: Content is protected !!