Wheat Sowing : पाण्याच्या उपलब्धतेनुसार गहू वाणांच्या निवडीचे केंद्राचे निर्देश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षी देशात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे देशभरात गहू लागवडीसाठी (Wheat Sowing) यंदा एकूण क्षेत्रापैकी 60 टक्के क्षेत्रावर हवामान अनुकूल (पाण्याच्या उपलब्धतेनुसार) वाणांची लागवड (Wheat Sowing) करण्याचे उद्दिष्ट सरकारकडून निश्चित करण्यात आले आहे. अशा वाणांमुळे देशातील गहू उत्पादनात स्थिरता आणण्यास मदत होईल. यासाठी केंद्र सरकारकडून एक देखरेख समिती स्थापन केली जाणार आहे. अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिली आहे.

केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे कृषी भवनात रब्बी पिकांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. जून महिन्यात देशभरात उशिरा दाखल झालेला मान्सून आणि ऑगस्ट मान्सूनमध्ये पडलेला खंड यामुळे सध्या देशातील अनेक भागात (Wheat Sowing) पाण्याचा अल्प भूजल साठा उपलब्ध आहे. त्यातच खरिपातील पिकांचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे रब्बी हंगामाच्या गहू उत्पादनात स्थिरता आणण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

अधिकाऱ्यांना कार्यवाहीचे निर्देश (Wheat Sowing In India)

या बैठकीत रब्बी लागवडीसंदर्भातील आकडेवारी विभागीय अधिकाऱ्यांनी सरकारकडे सादर केली आहे. त्यानुसार, देशातील काही भागात मृदेमध्ये ओलावा टिकून आहे. त्या ओलीवर रब्बी पिकांची पेरणी सुरू आहे. असे सांगण्यात आले आहे. तर देशात रब्बी हंगामात एकूण 648.33 लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांची लागवड केली जाते. सद्यस्थितीत 248.59 लाख हेक्टरवर रब्बी पिकांची लागवड झाली आहे. अशी माहितीही या बैठकीत अधिकाऱ्यांनी सादर केली आहे. यावेळी तोमर यांनी रब्बी पिकांच्या लागवडी संदर्भात देखरेख समिती स्थापन झाल्यानंतर, हवामान अनुकूल वाणांच्या निवडीसंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

error: Content is protected !!