Wheat Stock : देशातील गहू साठ्यात मोठी घट; वाचा.. गहू दरावर काय परिणाम होणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील सरकारी धान्याची खरेदी, वितरण आणि धान्य साठ्यांवर (Wheat Stock) देखरेख ठेवणाऱ्या भारतीय अन्नध्यान्य महामंडळाकडे (एफसीआय) सध्या गहू साठ्यात मोठी घट झाल्याचे समोर आले आहे. जी मागील सहा वर्षांमधील सर्वात मोठी घट असल्याचे सांगितले जात आहे. सध्यस्थितीत देशातील गहू साठा 2018 नंतर प्रथमच 100 लाख टनांपेक्षा कमी होऊन, 97 लाख टन इतका शिल्लक राहिला आहे. ज्यामुळे सध्या बाजारात गव्हाची उपलब्धता आणि गहू (Wheat Stock) दराबाबत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गहू साठ्यातील घटीची कारणे (Wheat Stock Decline In India)

मात्र, देशातील सध्याचा एफसीआयकडील गहू साठा (Wheat Stock) 100 लाख टनांहुन खाली घसरला असला तरी गहू काढणी हंगाम सुरु झाला आहे. त्यामुळे महामंडळाकडे योग्य तो गहू साठा उपलब्ध असल्याचे भारतीय अन्नध्यान्य महामंडळाने म्हटले आहे. त्यामुळे गहू दरावर तितकासा परिणाम होणार नसल्याचेही एफसीआयने म्हटले आहे. गहू साठ्यात घट होण्यामागे मागील दोन वर्षात केलेली कमी सरकारी गहू खरेदी आणि खुला बाजारात सर्वाधिक गहू विक्री केल्याने महामंडळाकडील राखीव साठ्यात घट झाल्याचे एफसीआयने स्पष्ट केले आहे. तर तांदूळ साठा सध्याच्या मागणीच्या चारपट अधिक असल्याचे एफसीआयने म्हटले आहे.

320 लाख टन गहू खरेदीचे लक्ष्य

गहू साठ्यातील घटीनंतर देखील राखीव साठा आवश्यकतेपेक्षा अधिक आहे. अशातच आता एफसीआयकडून यंदाच्या वर्षासाठी 1 मार्चपासून सुरु झालेल्या सरकारी गहू खरेदी दरम्यान, मागील दोन वर्षांपेक्षा अधिक गहू साठा करण्याची योजना बनवण्यात आली आहे. यावर्षी प्रामुख्याने केंद्र सरकारने एकूण 320 लाख टन गहू खरेदीचे लक्ष्य निर्धारित केले आहे. ज्यामुळे आगामी काळात सरकारला गहू दर नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत होणार आहे. दरम्यान, जून 2023 पासून केंद्र सरकारने फेब्रुवारी 2024 च्या शेवटीपर्यंत 90 लाख टनांहून अधिक गहू खुल्या बाजारात विक्री केला आहे.

मुबलक तांदूळ साठा

दरम्यान, सरकारी गहू साठा 100 लाख टनांहुन खाली घसरला असला तरी भारतीय अन्नधान्य महामंडळाकडे मोठ्या प्रमाणात तांदुळ साठा शिल्लक आहे. सध्याच्या घडीला एफसीआयकडे जवळपास 270 लाख टन तांदूळ साठा शिल्लक आहे. केंद्र सरकारच्या राखीव साठ्याच्या नियमानुसार १ एप्रिल रोजी देशात जवळपास 136 लाख टन तांदूळ शिल्लक असणे आवश्यक असते. मात्र, सध्या एफसीआयकडे त्या तुलनेत दुप्पट साठा शिल्लक असल्याचे सांगण्यात आले आहे.

error: Content is protected !!