Wheat Variety : ‘सोना मोती’ प्राचीनकालीन गव्हाची शेती; 100 रुपये किलोपर्यंत मिळतो दर!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रासह देशात विविध प्रजातीच्या माध्यमातून गहू पिकाचे (Wheat Variety) उत्पादन घेतले जाते. यात अनेक शेतकरी संकरित प्रजातीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गहू उत्पादन घेत आहेत. ज्यातून शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न देखील मिळत आहे. मात्र, आजही आपल्या देशात प्राचीन काळापासून असलेल्या गव्हाच्या काही प्रजाती संरक्षित असल्याचे पाहायला मिळते. या प्रजातींच्या माध्यमातून आजही शेतकरी गहू उत्पादन घेत आहेत. विशेष म्हणजे या गहू प्रजातींची (Wheat Variety) उत्पादकता देखील अधिक आहे. ज्या पद्धतीने सध्या वातावरणीय बदल दिसून येत आहे. त्यात देखील या गहू जाती सहनशील आहेत.

बिहारमध्ये होतीये शेती? (Sona Moti Wheat Variety)

2023-24 या चालू वर्षी देशातील उत्तरेकडील भागात बिहार या राज्यामध्ये ‘सोना मोती’ या हडप्पा संस्कृती कालीन गहू प्रजातीची (Wheat Variety) शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लागवड केलेली होती. या गहू प्रजातीपासून यंदा शेतकऱ्यांना हेक्टरी सरासरी 29 क्विंटल ते 34 क्विंटल उत्पादन मिळाले आहे. त्यामुळे आता आपल्या जुन्या संस्कृतीमधील गहू प्रजातीचे जतन करण्यासह, कमीत कमी खर्चात अधिक उत्पादन घेण्यास मदत होत आहे. असे बिहारच्या कृषी विभागाने म्हटले आहे. अलीकडे या प्रजातीच्या गव्हाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असून, त्यास 50 रुपये ते 100 रुपये प्रति किलोपर्यंतचा उच्चांकी दर मिळतो.

सोना मोती गव्हाची वैशिष्ट्ये?

‘सोना मोती’ ही गव्हाची पारंपारिक प्रजाती (Wheat Variety) असून, असे मानले जाते की हडप्पाकालीन संस्कृतीमध्ये या प्रजातीच्या गव्हाची शेती होत होती. त्याबाबतचे ठोस आधार इतिहास संशोधकांनी समोर आणत अधोरेखित केले आहे. या जातीचा गहू दाणा या गोल, सुडौल आणि चमकदार असतो. त्यामुळे या गव्हाला ‘सोना मोती’ म्हटले जाते. विशेष म्हणजे या प्रजातीचा गहू लागवड केल्यानंतर त्यावर रोगांचा किडींचा प्रादुर्भाव होत नाही. हा गहू अधिक पोषकतत्वे गहू असून, त्याचे आरोग्याला अनेक फायदे आहेत. या प्रजातीच्या गव्हामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन आणि खनिजे आहेत. इतकेच नाही तर ही गहू जात वातावरणीय बदलला सामोरे जाण्यास सक्षम असते.

मधुमेहींसाठी आहे गुणकारी

सध्याच्या घडीला खानपानातील बदलामुळे तसेच शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर केला जात आहे. ज्यामुळे सध्या अनेक मधुमेहासह अनेक रोगांनी ग्रासले आहे. या प्रजातीच्या गव्हाचा ग्लूटेन आणि ग्लायसीमिक सूचकांक हा खूपच कमी आहे. ज्यामुळे हा गहू मधुमेह असलेल्या रोग्यांसाठी उत्तम मानण्यात आला आहे. याशिवाय या गव्हामध्ये अन्य गहू जातींच्या तुलनेत अनेक पटीने अधिक फॉलिक ऍसिड असते. ज्यामुळे उच्च रक्तदाब व हृदयरोग असलेल्या व्यक्तींनी हा गहू आहारात समाविष्ट करणे रामबाण उपाय उपाय मानला जातो.

error: Content is protected !!