ऊसात घ्या ‘ही’ आंतरपिके आणि मिळावा डबल फायदा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यतल्या अनेक भागात उसाचे पीक घेतले जाते. यंदा पाऊस चांगला झाला आहे. त्यामुळे उसाचे उत्पादनही चांगले निघण्याची आशा आहे. शेतकरी मित्रांनो ऊस पिकामध्ये आंतरपीके घेतल्यास ते फायदेशीर ठरते. आजच्या लेखात आपण चालू उसात कोणती आंतरपीके घेतली जाऊ शकतात याची माहिती घेऊया…

ऊस लागवड केल्यानंतर त्याच्या पूर्ण उगवण होण्यासाठी सहा ते सात आठवड्यांचा कालावधी लागतो. सुरुवातीच्या काळामध्ये त्याची वाढ हळूहळू होते परंतु अशावेळी उसाच्या दोन सऱ्यांमध्ये मोकळ्या जागेत आंतरपीक घेतल्याने ऊसातील तणाचे प्रमाण कमी होते. सुरू उसामध्ये भुईमूग, मेथी, कोथिंबीर, कलिंगड, काकडी व कांदा ही आंतरपिके फायदेशीर ठरतात.

1- सुरू ऊस+ कांदा-

सुरू ऊस सहा ते आठ आठवड्यांचे झाल्यानंतर म्हणजेच त्याचे कोंब जमिनीवर उगवून आल्यानंतर कांदा या पिकाच्या रोपांची वरंब्यावर दोन्ही बाजूला लागण करावी. या आंतरपीक पद्धतीमध्ये कांद्याला उसाबरोबरच पाणी आणि खते मिळतात. त्यामुळे कांद्याला वेगळे पाणी आणि खत देण्याची आवश्यकता नसते. कांदा पिकाची मुळे जमिनीत खोलवर जात नाही. ते फक्त पाच ते दहा सेंटिमीटर एवढेच खोलीवर जातात. त्यामुळे तेवढ्यात जमिनीतून अन्नद्रव्ये शोषून घेतात. त्यामुळे कांदा या आंतरपिकाचा उसावर कुठल्याही प्रकारचा विपरीत परिणाम होत नाही. सुरुवातीच्या काळात उसाची वाढ खूप हळू गतीने होत असते तर त्याच काळात कांद्याची वाढ जलद गतीने होते. त्यामुळे तीन ते चार महिन्यात कांदा काढणीस तयार होतो. आंतरपीक म्हणून लागवड केलेल्या कांद्याची उत्पादकता सरासरी ही प्रति हेक्‍टरी दीडशे ते दोनशे क्विंटल एवढे मिळते.

2)सुरू ऊस + भुईमूग –

या आंतरपीक पद्धतीत जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी तसेच अतिरिक्त उत्पन्न व नफा मिळवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. उसाची उगवण झाल्यानंतर कोंब जमिनीवर आल्यावर भुईमूग या पिकाचे लागवड टोकण पद्धतीने वरंब्याच्या दोन्ही बाजूला करावी. भुईमूग पिकाला वेगळी अन्नद्रव्ये तसेच पाणी देण्याची आवश्यकता भासत नाही. ऊस पिकाला देण्यात येणारे खाते आणि पाणी भुईमूग पिकाला हि उपलब्ध होतात. भुईमूग पिके नत्र स्थिरीकरण करणारे पीक असल्यामुळे भुईमुगाच्या घाटीत रायझोबियम नावाचे जिवाणू हवेतील नत्राचे जमिनीत स्थिरीकरण सहजीवी पद्धतीने करतात. हे स्थिर झालेले नत्र नंतर ऊस पिकाला उपलब्ध होऊन त्याचा मोठा फायदा ऊसाला होतो.

3) सुरू ऊस+ मेथी किंवा कोथिंबीर-

या आंतरपीक पद्धती शक्यतो शहराच्या जवळपास असलेल्या ऊस क्षेत्रामध्ये घेतले जाते. उन्हाळ्यामध्ये मेथी आणि कोथिंबीर या पालेभाज्यांना बाजारात खूप मागणी असते. त्यामुळे रोख पैसे मिळवण्यासाठी शेतकरी उसात मेथी किंवा कोथिंबीर या भाज्यांची लागवड करू शकतात. उसामध्ये या भाज्यांची लागवड करताना उसाची उगवण झाल्यानंतर दोन्ही वरंब्याच्या बाजुने मेथी किंवा कोथिंबीर ची लागवड करावी. या आंतरपीक पद्धतीमुळे शेतकऱ्यांना कमी वेळात ऊसावर कुठलाही परिणाम न होता नगदी पैसा मिळतो.

संदर्भ : कृषी जागरण

Leave a Comment

error: Content is protected !!