White Brinjal Farming : सफेद वांग्याची शेती करेल मालामाल; वाचा… कसे असते खर्च व उत्पन्नाचे गणित?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील सर्वच भागांमध्ये वांग्याची शेती (White Brinjal Farming) मोठ्या प्रमाणात केली जाते. विशेष म्हणजे बाजारात वांग्याला नेहमीच मागणी असते. ज्यामुळे त्याला भावही चांगला मिळतो. परिणामी, शेतकऱ्यांना भाव सापडल्यास, वांग्याच्या शेतीतून मोठे आर्थिक उत्पन्न मिळते. साधारणपणे शेतकरी हिरव्या किंवा निळ्या रंगाच्या वांग्याची शेती करतात. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये अंड्यासारख्या दिसणाऱ्या पांढऱ्या वांग्याची मागणी बाजारात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. इतकेच नाही तर विदेशात देखील पांढऱ्या वांग्यांना मोठी मागणी असते. याच पार्श्वभूमीवर आज आपण पांढऱ्या वांग्याच्या लागवडीबाबत (White Brinjal Farming) माहिती जाणून घेणार आहोत.

कधी होते लागवड? (White Brinjal Farming In India)

सर्वसाधारणपणे वांग्याची शेती खरीप, रब्बी आणि उन्हाळी अशा तिन्ही हंगामांमध्ये केली जाते. मात्र, पांढऱ्या वांग्याची शेती (White Brinjal Farming) प्रामुख्याने मार्च किंवा एप्रिल महिन्यात आणि डिसेंबर महिन्यात केली जाऊ शकते. बाजारात हे पांढरे वांगे दिसत नाहीत. त्यामुळे त्यांना दरही अधिकचा मिळतो. या सफेद वांग्याच्या लागवडीसाठी सर्वप्रथम योग्य बियाण्याची निवड करून, नर्सरीमध्ये रोपे तयार करत सामान्यपणे लागवड करणे आवश्यक ठरते. हे सफेद वांगे शरीरासाठी खूप पौष्टिक असते. विशेष म्हणजे वांग्याला अधिक काळापर्यंत फळ मिळते. ज्यामुळे शेतकऱ्यांना अधिक काळ कमाई मिळण्यास मदत होते.

किती येतो खर्च?

सर्वसाधारणपणे सफेद वांग्याच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी दोन लाखांपर्यंतचा खर्च येऊ शकतो. यात ठिबक, मल्चिंग असा सर्व प्राथमिक खर्च धरला जाऊ शकतो. ठिबक व्यवस्था असेल तर सफेद वांग्याच्या शेतीला अधिक पाण्याचीही आवश्यकता नसते. त्यानंतर शेतकरी आपल्याकडील सेंद्रिय खते किंवा कंपोस्ट खते वापरून या पिकाचा उत्पादन खर्च देखील कमी करू शकतात. याशिवाय शेतकरी सफेद वांग्याला सेंद्रिय निंबोळी अर्क तयार करून कीड नियंत्रण करू शकतात. सफेद वांग्याचे पीक हे ;लागवडीनंतर ७० ते ९० दिवसांत तोडणीला येते.

किती मिळते उत्पादन/उत्पन्न?

शेतकऱ्यांनी सफेद वांग्याच्या लागवडीसाठी योग्य वाणाची निवड, योग्य पीक व्यवस्थापन तसेच वेळोवेळी आवश्यक तितकेच पाणी दिले. तर शेतकऱ्यांना हेक्टरी 100 टन वांग्याचे उत्पादन सहज मिळू शकते. बाजारात वांग्याला कमीत कमी १० ते १५ रुपये प्रति किलोचा दर सहज मिळतो. ज्यामुळे शेतकऱ्यांना एक हेक्टर शेतीतून १० ते १५ लाखांची कमाई सहज मिळू शकते. अर्थात एखाद्या शेतकऱ्याने पांढऱ्या वांग्याची लागवड बिघाभर शेतीत केल्यास, अशा शेतकऱ्यांना बिघ्यात २ लाख उत्पन्न सहज मिळू शकते. सामान्य वांग्याची शेतीची आणि पांढऱ्या वांग्याची शेती जवळपास सारखीच असते.

अधिक पौष्टिक गुणधर्म

भारतात प्रामुख्याने पांढऱ्या वांग्याची सर्वाधिक लागवड जम्मू-काश्मीर राज्यामध्ये होते. इतर राज्यामध्ये कमी-अधिक प्रमाणात पांढऱ्या वांग्याचे उत्पादन होते. मात्र इतर राज्यामध्ये सफेद वांग्याची लागवड ही फारच नगण्य स्वरूपात होते. हिरव्या, निळ्या रंगाच्या वांग्यापेक्षा या सफेद वांग्यामध्ये अधिक पौष्टिक गुणधर्म आढळतात, त्यामुळेच बाजारात त्याला मागणीही जास्त असते.

error: Content is protected !!