Cotton Crop : यावर्षी पावसाला उशीर झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या देखील उशिरा झाल्या आहेत. त्यामुळे कापूस पेरणीचे क्षेत्र कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक शेतकऱ्यांनी कापूस लागवड कमी करून सोयाबीन लागवड जास्त प्रमाणात केली आहे. याचं कारण फक्त पाऊस नसून कापसाला मिळालेले भाव आहेत. कारण कापसाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली नसल्याचे म्हटले जात आहे.
यावर्षी पाऊस देखील कमी झाला त्याचबरोबर काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला आणि कापसाच्या भावामध्ये देखील चढ-उतार पाहायला मिळाला त्यामुळे ही सर्व संकट असतानाही यावर्षी महाराष्ट्र मध्ये 5.5 लाख हेक्टर जमिनीवर कापसाची पेरणी झाली आहे. यामध्ये मागच्या वर्षीच्या हंगामाच्या तुलनेत सुमारे 17000 हेक्टरवर पेरणी कमी झाली आहे. मात्र असे असले तरी अद्याप पर्यंतच्या या पिकाच्या लागवडीचा अंतिम अहवाल आलेला नाही त्यामुळे कापूस लागवडीमध्ये अजून वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सोयाबीनला प्राधान्य
मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी कापूस लागवड कमी करून सोयाबीन लागवड जास्त केली आहे. कारण कापसाला योग्य भाव मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान जळगाव जिल्ह्यामध्ये सोयाबीनचे संभावित क्षेत्र सुमारे 28 हजार हेक्टर आहे. जिल्ह्यात एवढी पेरणी झाली आहे कारण जुलै महिन्यामध्ये अनेक ठिकाणी चांगला समाधानकारक पाऊस झाला असल्याने पेरण्या देखील चांगल्या प्रमाणात झाल्या आहेत.
जळगाव जिल्हा कायम कापूस लागवडीत अग्रेसर असतो मात्र यावर्षी जळगाव मध्ये देखील कापूस लागवड कमी झाल्याचे पाहायला मिळाले आहे. याचं कारण असं की, मागच्या वर्षी कापसाला दर कमी मिळाला त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागला. यामुळे यंदाच्या वर्षी शेतकऱ्यांनी कापूस लागवडीपेक्षा सोयाबीन लागवडीला प्राधान्य दिले आहे.
या ठिकाणी पहा कापसाचा बाजार भाव
शेतकरी मित्रांना तुम्हाला जर घर बसल्या कापसाचे बाजार भाव पाहिजे असेल तर असतील तर आत्ताच प्ले स्टोअर वर जा आणि Hello Krushi हे ॲप मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा. हे ॲप मोबाईल मध्ये इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही कापसाचे रोजचे बाजार भाव पाहू शकता. त्याचबरोबर अन्य शेतपिकाचे देखील तुम्ही रोजचे रोज बाजार भाव पाहू शकता. त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल तर लगेचच प्ले स्टोरवरून आपले Hello Krushi हे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा.