Wild Animals : जंगली प्राण्यांमुळे पिकांची नासधूस होतीये; वापरा ‘हा’ गोमुत्राचा जुगाड!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील काही भागांमध्ये रब्बी हंगामातील गहू, हरभरा पिके (Wild Animals) चांगलीच जोमात आहे. मात्र शेतकऱ्यांच्या या पिकांची जंगली प्राणी (नीलगाय, हरीण, रानडुक्कर) मोठी नासधूस करत असल्याचे पाहायला मिळते. काही शेतकरी तर अक्षरशः प्राण्यांपासून होणाऱ्या पिकांच्या नासधुसीला वैतागलेले असतात. प्राण्यांपासून पिकांच्या होणाऱ्या या नासधुसीमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतो. मात्र, तुम्ही आता काही घरगुती जुगाड करून जंगली प्राण्यापासून (Wild Animals) होणारे हे पिकांचे नुकसान टाळू शकतात.

आपण आज जंगली प्राण्यांपासून (Wild Animals) पिकांचे संरक्षण करण्याच्या ज्या पद्धतीबद्दल जाणून घेणार आहोत. ती पीक संरक्षण संशोधकांच्या अनुभवातून समोर आली आहे. त्यामुळे तुम्हीही या घरगुती पद्धतीचा वापर करून, जंगली प्राण्यांना तुमच्या पिकात येण्यापासून रोखू शकतात. विशेष म्हणजे तुम्हाला या पद्धतीसाठी फारसा खर्च देखील येणार नाही, यासाठीची बऱ्याच वस्तू तुमच्याकडे घरी उपलब्ध असतात. चला तर मग जाणून घेऊया, जंगली प्राण्यांना हुसकावून लावणारे हे जैविक औषध कसे बनवतात.

असे बनवा जैविक औषध (Wild Animals Crops Destroyed)

शेतकऱ्यांना 5 लिटर गोमूत्र, एक किलो शेण, अडीच किलो बकानाच्या झाडाचा पाला, अडीच किलो कडुनिंबाच्या झाडाचा पाला, एक किलो धोतरा, एक किलो रुईची पाने, 250 ग्रॅम सुरती अर्थात तंबाखूची पाने, 250 ग्रॅम लाल मिरची, 250 ग्रॅम लसूण या सर्व वस्तूंचे एकत्रिपणे चांगले मिश्रण करून घ्यायचे. या सर्व वस्तू चांगल्या मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याकडे जुनी काही मातीची भांडी (रांजण, माठ) असेल तर त्यात हे मिक्स केलेले मिश्रण 25 दिवस ठेवायचे आहे. या मातीच्या भांड्याचे तोंड चांगले घट्ट बांधायचे आहे. जेणेकरून यात हवेचा प्रवेश होऊ नये. विशेष म्हणजे तुम्हाला या भांड्याचा एक तृतीयांश हिस्सा हा मोकळा ठेवायचा आहे. कारण विखंडणाच्या प्रक्रियेमुळे कार्बन गॅसची निर्मिती होऊन हे मातीचे भांडे फुटण्याची शक्यता असते.

25 दिवसांमध्ये औषध तयार

२५ दिवसानंतर हे औषध पूर्णपणे तयार झाल्यानंतर, या मातीच्या भांड्याचे तोंड मोकळे करा. यावेळी एक उग्र वास असणारे जैविक औषध तयार झालेले असेल. तुम्ही आतापर्यंत बनवलेले मिश्रण हे एकरासाठीचे आहे. त्यामुळे यातील निम्मे औषध 100 लिटर पाण्यात मिसळून, त्यात 250 ग्राम धुण्याचा सोडा वापरून बिघाभर शेतासाठी फवारणी करा. ही फवारणी केल्यानंतर कोणतेही जंगली प्राणी तुमच्या शेताजवळ सुद्धा फिरकणार नाही.

कोणत्या पिकांवर कराल फवारणी

पीक संरक्षण संशोधकांच्या म्हणण्यानुसार, तुम्ही बनवलेले औषध हे जितके जास्त दिवस मातीच्या भांड्यात ठेवाल तितके अधिक चांगले असते. शेतकरी हे औषध कडधान्य (हरभरा), गहू, ऊस, मकासहित सर्व पिकांवर फवारू शकतात. याशिवाय भाजीपाला पिकांवर देखील या जैविक औषधाची फवारणी केली जाते. वापरानंतर उरलेले जैविक औषध हे नेहमी झाकून ठेवावे. या औषधाचा वास टिकून राहणे गरजेचे असते.

error: Content is protected !!