Wild Animals : जंगली प्राणी पिकांची नासाडी करताय? केवळ 200 रुपयांमध्ये करा ‘हा’ प्रभावी उपाय!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या लेट रब्बी हंगामातील पिके (Wild Animals) आणि भाजीपाल्यासह उन्हाळी पिके शेतात आहेत. मात्र, अनेक भागांमध्ये हरीण, रानडुक्कर, रानगवा, नीलगाय या जंगली प्राण्यांचा धुडगूस होत असल्याच्या शेतकरी सातत्याने तक्रारी करत असतात. त्यामुळे तुम्हालाच्या पिकांची हे जंगली प्राणी नासाडी करत असतील. तर आज आम्ही तुम्हाला केवळ 200 रुपयांमध्ये केला जाणारा एक प्रभावी देशी जुगाड सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला जंगली प्राण्यांपासून (Wild Animals) तुमच्या पिकाची नासाडी होण्यापासून बचाव करण्यास मदत होणार आहे.

लावा दोन सेन्सर लाईट (Wild Animals Crop Damage)

सध्याच्या घडीला शेतामध्ये पिकांचे प्रमाण खूप कमी झाले आहे. ज्या शेतकऱ्यांना पाणी असेल. तेच शेतकरी मोठया कष्टातून भाजीपाल्यासह उन्हाळी पिके घेत आहेत. मात्र, खायला काही नसल्याने आणि परिसरात केवळ काही निवडक शेतकऱ्यांचा शेतीत माल असल्याने जंगली प्राणी (Wild Animals) उठसुठ पिकांची नासाडी करत असल्याचे शेतकरी सांगतात. मात्र सध्या बाजारात अगदी स्वस्तात 100 ते 200 रुपयांमध्ये आकर्षक ‘सेन्सर लाईट’ विकत मिळतात. हे सेन्सर लाईट खरेदी करून तुम्ही शेताच्या दोन टोकांना फिरत्या स्वरूपात त्यांना लावू शकतात. डीजे किंवा लग्न समारंभामध्ये असे सेन्सर लाईट सहज पाहायला मिळतात. त्यापैकी तुम्हाला केवळ दोन छोट्या लाईटची व्यवस्था शेतात करायची आहे. या लाईटच्या प्रकाशामुळे रात्रीच्या सुमारास हे प्राणी तुमच्या शेताकडे फिरकणार सुद्धा नाही.

100 टक्के प्रभावी उपाय

शेतकऱ्यांच्या तक्रारींनंतर आतापर्यंत ‘हॅलो कृषी’कडून जंगली प्राण्यांचा धुडगुस कमी करण्यासाठी अनेक प्रभावी उपाय सुचवण्यात आले आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांची तक्रार असते. की दिवसा आपण आपल्या पिकांचे जंगली प्राण्यांपासून संरक्षण करतो. मात्र रात्रीच्या सुमारास जंगली प्राणी येऊन पिकाची नासाडी करतात. अशी तक्रार असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा प्रभावी उपाय असणार आहे. एका शेतकऱ्याने अनुभवातून हा प्रयोग केला असून, त्याला त्याच्या पिकाचे रात्रीच्या सुमारास जंगली प्राण्यांपासून 100 टक्के संरक्षण करण्यात यश आल्याचे त्याने सांगितले आहे.

करा फिनाईलची फवारणी

याशिवाय आजकाल सर्वच शेतकऱ्यांकडे फरशी, सिमेंटची घरे आहेत. त्यामुळे फिनाइलचा वापर स्वच्छतेसाठी केला जातो. हे सर्वांनाच परिचित आहे. एका शेतकऱ्याने असाही प्रयोग केला आहे की, बाजारातून फिनाईल आणून बांधांवर पाण्यात मिसळून फवारणी केल्यास, जंगली प्राणी शेतात प्रवेश करत नाही. फिनाइलच्या उग्र वासामुळे हे प्राणी पिके किंवा शेतापासून दूर राहत असल्याचे या शेतकऱ्याने अनुभवातून सांगितले आहे. त्यामुळे आवश्यक वाटल्यास तुम्ही हा प्रयोग देखील करून पाहू शकतात.

error: Content is protected !!