Wild Animals : जंगली प्राण्यांसाठी देशी जुगाड; शेतात येणारच नाही, नक्की करून बघा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या रानडुक्कर, हरिण आणि नीलगाय या प्राण्यांमुळे (Wild Animals) शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा त्रास होत आहे. इतकंच नाही तर दोनच दिवसांपूर्वी एका भाजप आमदाराने या प्राण्यांना मारण्याची परवानगी देण्यात यावी. अशी मागणी केली होती. मात्र आपल्यापैकीच एका शेतकऱ्याने केलेला देशी जुगाड आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्याद्वारे तुम्ही आपल्या शेतातून नीलगाय, रानडुक्कर, हरिण (Wild Animals) यांना हुसकावत आपल्या पिकाचे रक्षण करू शकता. चला तर मग जाणून घेऊया काय आहे तो देशी जुगाड…

अत्यल्प खर्चात होईल काम (Crops protection from Wild Animals)

नीलगाय, रानडुक्कर, हरिण हे प्राणी (Wild Animals) सध्या राज्यातील शेतकऱ्यांच्या हरभरा तसेच अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहे. हे प्राणी खाण्यापेक्षा पिकाचे नुकसानच अधिक करत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शेतकरी आपापल्या परीने काही उपाय करत आहे. मात्र आज तुम्हाला आपल्यापैकीच एका शेतकऱ्याने केलेला जुगाड सांगणार आहोत. त्याला खर्चही तुम्हाला अत्यंत कमी येणार आहे. तुम्ही बाजारातून एक बॅटरी विकत आणा. आपल्या प्रत्येकाच्या घरी ती असतेच. ही बॅटरी एका सात ते आठ फूट लाकडाला बांधून रात्रीच्या वेळी शेतात लावून ठेवायची आहे. ज्यामुळे तुमच्या शेतात तुम्ही असल्याचे जंगली प्राण्यांना वाटेल. त्यामुळे ते शेतात येणार नाहीत.

अन्य काही जुगाड

जंगली प्राण्यांना शेतात न येऊ देण्यासाठी तुम्ही अन्य प्रकारच्या जुगाडचा देखील अवलंब करू शकता. यामध्ये प्रामुख्याने तुम्ही कांद्याच्या रसाची वाळूसोबत निंबाच्या पानाच्या डगळ्याच्या साहाय्याने पिकावर फवारणी करू शकता. ज्यामुळे कांद्याच्या उग्र वासामुळे हे प्राणी शेतात येणार नाही. यामध्ये शक्य असल्यास लसूणचा वापरही तुम्ही करू शकता. याशिवाय शेताच्या बाजूने एरंडाची झाडे लावू शकता. याशिवाय तुम्ही तुमच्या शेताच्या कडेला नियोजनपूर्वक पीक घेण्याआधी गुसबेरी, तुळस, मेथी किंवा लेमन ग्रासची लागवड करू शकतात. या वनस्पतींच्या सुगंधामुळे नीलगाय तुमच्या शेतात येणार नाही. या सर्व उपायांनी तुम्ही तुमची पिके नीलगायीच्या दहशतीपासून वाचवू शकतात.

error: Content is protected !!