Wine Industry : द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकार राबविणार ‘ही’ योजना!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी वाईन (Wine Industry) उद्योगास प्रोत्साहन देण्याचे ठरवले असून, त्यासाठी राज्यात पुढील पाच वर्षांसाठी ‘वाईन उद्योग प्रोत्साहन योजना’ राबविली जाणार आहे. अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिली आहे. त्यामुळे आता नाशिक आणि सांगली या प्रमुख द्राक्ष उत्पादक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना (Wine Industry) याचा मोठा फायदा होणार आहे.

कोरोना काळात 2020-21 मध्ये ही योजना (Wine Industry) सरकारकडून बंद करण्यात आली होती. राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना द्राक्ष लागवडीसाठी प्रोत्साहन देणे, सुका मेवा (मनुका) बनविणे तसेच पर्यायी उत्पादनांची निर्मिती करण्यासाठी ही ‘वाईन उद्योग प्रोत्साहन योजना’ सुरु करण्यात आली आहे. ही योजना राज्यात वाईन उद्योग विकसित करण्यासाठी देखील उपयुक्त ठरणार असल्यामुळे या योजनेस पुढील 5 वर्षासाठी राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही योजना पुन्हा सुरू झाल्याने विशेषतः नाशिक तसेच सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होऊ शकणार आहे. या दोन जिल्ह्यांमध्ये राज्यातील जवळपास 50 टक्के द्राक्ष उत्पादन घेतले जाते.

उद्योजकांना व्हॅटचा परतावा मिळणार (Wine Industry Govt Scheme)

या योजनेंतर्गत 2020-21, 2021-22 तसेच 2022-23 या वर्षात वाईनरी उद्योजकांनी व्हॅटचा भरणा केला आहे. 2023-24 हे आर्थिक वर्ष संपण्यास कमी कालावधी शिल्लक असून, योजना बंद होण्यापूर्वी निश्चित केलेल्या 16 टक्के प्रमाणे व्हॅटचा परतावा उद्योजकांना देण्यात येईल. असेही राज्य सरकारकडून या बैठकीत सांगण्यात आले आहे. देशातील द्राक्ष पिकाखाली असलेल्या एकूण 1,18,740 हेक्टर क्षेत्रापैकी 90,000 हेक्टर (75.80 टक्के) क्षेत्र एकट्या महाराष्ट्रात आहे. या 90,000 हेक्टर क्षेत्रामध्ये राज्यात एकूण 21,60,000 मेट्रिक टन द्राक्ष उत्पादन होते. जे देशातील एकूण उत्पादनाच्या 83.24 टक्के आहे. अर्थात राज्यात इतर राज्यांच्या तुलनेत प्रति एकरी जास्त उत्पादन घेतले जाते. त्यामुळे आता या योजनेचा राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

error: Content is protected !!