HEAT WAVE : आज राज्याच्या ‘या’ भागाला उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो राज्यात काही दिवसांपासून 45 अंश यांच्यावर तापमान(Heat Wave) पोहोचलं होतं. मात्र आता त्यातून काहीसा दिलासा मिळाला असून आता राज्यातील कमाल तापमान 44 अंश सेल्सिअस पर्यंत नोंदविण्यात आले आहे. त्यामुळे उष्णतेपासून सामान्य नागरिकांना तसेच शेतकऱ्यांनाही थोडासा दिलासा मिळाला आहे. हवामान खात्याचे तज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार पाच मे पासून आठ मे पर्यंत विदर्भ आणि उत्तर मध्य महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान काल दिनांक 4 मे रोजी राज्यातल्या काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली हिंगोली जिल्ह्यात देखील पाऊस झाला. आता राज्यातल्या शेतकऱ्यांना मान्सूनपूर्व पावसाची आशा आहे.

अंदमान समुद्रावर वादळी वाऱ्याची शक्यता

दिनांक पाच मे रोजी दक्षिण अंदमान समुद्र आणि लगतच्या अग्नेय बंगालच्या उपसागरावर जोरदार वारे वाहण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. या वाऱ्याचा वेग प्रति तास 40 ते 50 किलोमीटर इतका राहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. तर दिनांक 6 मे रोजी अंदमान समुद्र आणि लगतच्या आग्नेय आणि पूर्व मध्य बंगाल उपसागरावर जोरदार वारा वाहण्याची शक्यता असून 50 ते 60 किलोमीटर प्रतितास वेगाने हवा वाहण्याची शक्यता आहे. दिनांक 6 रोजी अंदमान समुद्र आणि लगतच्या भागांमध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असून त्यानंतरच्या 24 तासांमध्ये आणखी दबाव वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

आज या भागाला यलो अलर्ट

आज महाराष्ट्रातील अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या भागाला उष्णतेच्या लाटेचा(Heat Wave) इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याकडून या भागांमध्ये आजच्या दिवशी जारी करण्यात आला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!