Young Farmer Success Story: केरळ मधील पंधरा वर्षीय मुलगा झाला राज्यातील ‘सर्वोत्कृष्ट विद्यार्थी शेतकरी’, पुराशी झुंज देत शेतीतील यशोगाथा लिहिली!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: केरळ राज्यातील (Young Farmer Success Story) कुट्टनाड तालुक्यातील मिथ्राकरी या छोट्या गावातील पंधरा वर्षीय अर्जुन अशोक याने केरळ (Kerala)  कृषी विभागाचा राज्यातील ‘सर्वोत्कृष्ट विद्यार्थी शेतकरी’ (Best Student Farmer) पुरस्कार जिंकून उल्लेखनीय कामगिरी केली. विशेष म्हणजे पुरासारख्या आव्हानांना तोंड देत त्याने हे यश मिळवले असल्यामुळे हे यश (Young Farmer Success Story) सर्वांसाठी अधिक विशेष आहे.

अर्जुन लहान वयातच शेतीकडे (Agriculture) ओढला गेला आणि त्याने मागे वळून पाहिले नाही. “मी माझ्या आईकडून शेतीची पहिली पायरी शिकलो” असे तो अभिमानाने सांगतो. त्याच्या आईने शेतीसाठीची त्याची ओढ ओळखली आणि त्याला प्रोत्साहन दिले. त्यामुळे वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी अगदी लहान असतांना त्याने स्वत: भाजीपाला पिकवायला सुरुवात केली.

कोविड-19 महामारीमुळे शाळा बंद पडल्या, तेव्हा त्याने त्याचा मोकळा वेळ शेतीसाठी आणि तंत्रज्ञान (Agriculture Technology) समजून घेण्यासाठी वापरला.

अर्जुन हा सेंट झेवियर्स हायस्कूल, मिथ्राकरी येथील दहावीचा विद्यार्थी असून “माझ्यासाठी  शालेय शिक्षण आणि शेती हे दोन्हीही सारखेच महत्वाचे आहे” असे तो सांगतो(Young Farmer Success Story).  

हा विद्यार्थी शेतकरी आज सुमारे 50 टक्के जमिनीवर विविध प्रकारच्या भाज्या (Vegetable Crops) आणि फुलांची लागवड करतो, ज्यामध्ये त्याचा कौटुंबिक प्लॉट आणि त्याच्या नातेवाईकांच्या आणि शेजाऱ्यांच्या मालकीच्या जमिनीचा समावेश आहे.

शेतीत बहुतेक जैविक कीटकनाशके (Biological Pesticides) आणि कंपोस्ट (Compost) तसेच स्वयंपाकघर आणि प्राण्यांच्या कचऱ्यापासून तयार होणारे कंपोस्ट खत वापरतो. याशिवाय शेळ्या, ससे, कोंबडी पालन (Animal Husbandry) सुद्धा करतो.  

अडचणींवर मात

अर्जुन त्याच्या शेतीच्या वेडामुळे त्याने अत्यंत गंभीर परिस्थितीवर सुद्धा विजय मिळवला. अर्जुनने काही महिन्यांपूर्वी ओणम या सणाला ध्यानात ठेवून भाज्या आणि झेंडूची लागवड केली होती. जुलैमध्ये कुट्टनाडला आलेल्या मुसळधार पावसाने आणि पुरामुळे त्यांची अनेक झाडे नष्ट झाली.

पुरामुळे शेती प्रभावित होण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. या पुरामुळे त्याच्या शेतीचे प्रचंड  नुकसान झाले पण त्यामुळे त्याचा संकल्प आणखी मजबूत झाला. पूर ओसरल्यानंतर त्याने पुन्हा सुरुवात केली आणि पालक, भेंडी, वांगी, चवळी आणि कारले यांची लागवड केली,” अर्जुन सांगतो, यावेळी कृषी विभागाने दिलेला पाठिंबा त्याच्यासाठी प्रेरणादायी आहे.

काही भाजीपाला तो पिशव्यामध्ये पिकवत आहे. प्रायोगिक तत्त्वावर, पुराशी सामना करण्यासाठी  झेंडूची लागवड तो लाकडाच्या प्लॅटफॉर्मवर वाढलेल्या पिशव्यामध्ये करत आहे.

हा तरुण शेतकरी स्वतः बहुतांशी स्थानिक कृषी भवनाच्या आठवडी शेतकरी बाजारात शेतीमाल विकतो. विक्रीतून मिळालेली रक्कम त्याच्या स्वत:च्या बँक खात्यात जमा करतो.

“लहान वयातच शेतीला सुरुवात करणारा अर्जुन जवळपास एकट्याने शेती करत आहे. तो रासायनिक कीटकनाशकांचा वापर न करता भाजीपाला आणि फुले पिकवतो,” असे कृषी भवन, मुत्तर येथील कृषी अधिकारी सांगतात.

या सर्व कार्यात अर्जुनला त्याची आई शोभा अशोक आणि वडील अशोक कुमार यांचा पाठिंबा आहे.

खेळण्याच्या वयात अर्जुनने शेतीत केलेले कार्य अचंबित करणारे आहे. त्याची इच्छाशक्ती आणि मेहनत यामुळे तो यशाचे अनेक पल्ले गाठणार यात शंकाच नाही.

error: Content is protected !!