धक्कादायक ! सोशल मिडीयावर स्टेटस ठेवत तरूण शेतकऱ्याची आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे

आज परभणी जिल्ह्यात पुन्हा एकदा शेतकऱ्याने आत्महत्या केलीये. विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्या अगोदर, सोशल माध्यम असलेल्या व्हाट्सअपवर स्टेटस ठेवत, उद्या आपली माती आहे मातीला या असे आवाहन केलं होतं. सोनपेठ तालुक्यातील चीवठाणा या गावातील चंद्रकांत भगवानराव धोंडगे वय ३५ वर्ष असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे .

चंद्रकांत ला केवळ पाच एकर शेती आहे. काल दुपारी तो घरामधून बाहेर पडला आणि त्यानंतर शेतामध्ये जाऊन त्याने विष प्राशन केले. मोबाईलवर ठेवलेल्या स्टेटस ठेवल्यामुळे गावातील काही मुलांना हा प्रकार कळला आणि त्यांनी शेतामध्ये जाऊन शोधाशोध केली. त्यावेळी चंद्रकांत त्यांना तेथे आढळून आला.

याप्रकरणी पोलिसांना कळविल्यानंतर सोनपेठ पोलिसांनी, चंद्रकांत यांच्या घरातील व्यक्ती कडे चौकशी केली असता,घरातील लोकांनी आत्महत्येचे कारण स्पष्ट नाहीये म्हटल्यांने सोनपेठ पोलीस ठाण्यामध्ये चंद्रकांतच्या, आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. चंद्रकांत घरामध्ये पत्नी दोन मुले आणि एक लहान भाऊ असा परिवार असून, त्याचे आई-वडील हयात नाहीत.

Leave a Comment

error: Content is protected !!