गोदावरी पात्रात 1 लाख 32 हजार 368 क्‍युसेक विक्रमी पाणी विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी जिल्हात येणाऱ्या गोदावरी नदीवरील उच्च पातळी बंधाऱ्यांचे दरवाजे आठवड्याभराच्या आत दुसर्‍यांदा उघडण्याची वेळ आली असून 5 सप्टेंबर रोजी जिल्हातील पहिल्या क्रमांकाच्या ढालेगाव उच्च पातळी बंधाऱ्या मधून तब्बल 1लाख 32 हजार 368 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला.

4 व 5 सप्टेंबरच्या मध्यरात्री मराठवाड्यातील गोदावर नदी खोऱ्यातील पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसाने वरील बाजूस असलेल्या लोणीसावंगी व इतर उच्च पातळी बंधाऱ्या मधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने सकाळपासुनच पाथरी तालुक्यातील ढालेगाव ,तारूगव्हाण व मुदगल बंधाऱ्याधून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला होता. तो 5 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वा. नंतर वाढवण्यात आला असून ढालेगाव बंधाऱ्याचे क्रमांक1 ते 15 क्रमांकाची दरवाजे उघडे करत नदीपात्रामध्ये 1 लाख 32 हजार 368 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला. त्यामुळे आठवड्याच्या आतच गोदावरी नदी दुसऱ्यांचा दुथडी भरून वाहू लागली.

पाथरी तालुक्यातील शेवटचा बंधारा असणाऱ्या मुदगल उच्च पातळी बंधाऱ्याची पाणी पातळी 383 .60 झाल्याने या ठिकाणी 7 दरवाजे उघडत नदीपात्रात 54 हजार 541 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला होता परंतु वरील बंधाऱ्या मधून पाणी विसर्ग वाढला असल्याने उर्वरित दरवाजे केव्हाही उघडल्या जातील व त्यामुळे नदी पात्रात 1 लाखापेक्षा जास्त क्‍युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याने, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता अशी माहिती पाटबंधारे विभाग उपविभाग पाथरीचे अभियंता दिवाकर खारकर यांनी दिली आहे .

Leave a Comment

error: Content is protected !!