शिक्कामोर्तब … ! मोदी सरकारकडून 10 करोड शेतकऱ्यांना मिळणार नववर्षाची भेट ; जारी होणार PM KISAN चा 10 वा हप्ता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मोदी सरकार कडून नव्या वर्षात देशातील शेतकऱ्यांना मोठी भेट मिळणार आहे. १ जानेवारी २०२२ रोजी दुपारी १२: ३० वाजता मोदी सरकार १० करोड शेतकऱ्यांच्या खात्यात PM KISAN चा १० वा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरेन्स द्वारे शेतकऱ्यांशी संवाद साधतील. याच वेळी 20,000 कोटी इतकी रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर केली जाईल. याबाबतची माहिती. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिग तोमर यांनी ट्विटर द्वारे दिली आहे.

उत्पादक संस्थांना 14 कोटी रुपयांहून अधिक इक्विटी अनुदान
तोमर यांनी दिलेल्या ट्विट मध्ये म्हंटले आहे “व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, 10 कोटींहून अधिक लाभार्थी शेतकरी कुटुंबांना 20,000 कोटी रुपयांहून अधिक रक्कम आणि सुमारे 351 शेतकरी उत्पादक संस्थांना 14 कोटी रुपयांहून अधिक इक्विटी अनुदान दिले जाईल” .

पीएम किसान लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी आधार अनिवार्य
मोदी सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजना 2021 मध्ये मोठा बदल केला आहे. शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केल्यासच त्यांना पुढील हप्ता मिळेल. त्याशिवाय त्यांचा हप्ता येणार नाही.सरकारने पीएम किसान योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी आधार अनिवार्य केले आहे.

पंतप्रधान किसानचा शेतकऱ्यांसाठी संदेश
पीएम किसान योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी eKYC अनिवार्य असल्याचे सरकारी पोर्टलचे म्हणणे आहे. त्यात सांगितले आहे की आधार आधारित OTP प्रमाणीकरणासाठी फार्मर कॉर्नरमधील eKYC पर्यायावर क्लिक करा आणि बायोमेट्रिक प्रमाणीकरणासाठी जवळच्या CSC केंद्रांशी संपर्क साधा असे सांगण्यात आले आहे.

ई-केवायसी कसे भरावे
— PM KISAN च्या अधिकृत संकेतस्थळावर जा https://www.pmkisan.gov.in/
–उजव्या बाजूला तुम्हाला eKYC लिंक मिळेल. त्यावर क्लिक करा.
–आता तुमचा आधार क्रमांक आणि इमेज कोड टाका आणि सर्च बटणावर क्लिक करा
–यानंतर आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर टाका आणि OTP टाका
–जर दिलेली सर्व माहिती बरोबर असेल तर eKYC पूर्ण होईल अन्यथा नाही.
–ई-केवायसी ऑफलाइन भरण्यासाठी तुम्ही आधार सेवा केंद्राचीही मदत घेऊ शकता.

तपासा अद्ययावत लाभार्थी यादी
याशिवाय, शेतकऱ्यांनी त्यांच्या अर्जाची नेमकी स्थिती जाणून घेण्यासाठी पीएम किसान लाभार्थी स्थिती आणि यादी देखील तपासली पाहिजे. यासाठी, त्यांना अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल, आणि शेतकरी कॉर्नर विभागात, तपशील जाणून घेण्यासाठी लाभार्थी स्थिती किंवा लाभार्थी यादीवर क्लिक करावे लागेल.

Leave a Comment

error: Content is protected !!