ई-नाम प्लॅटफॉर्मला 1 हजार बाजार समित्या जोडणार : कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकार 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारच्या प्रयत्नाचा भाग म्हणून कृषी मंत्रालय आणखी बाजार समित्या ई-नामशी जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. नरेंद्र सिंह तोमर यांनी दिलेल्या माहितीनुसर पुढील काळात ई-नामवरील बाजार समित्यांची संख्या 2000 हजारापर्यंत पोहोचेल. तर,उप बाजारसमित्यांची शंख्या 4 हजारांपर्यंत पोहोचू शकते. ई-नाम पोर्टलवर देशातील जवळपास 1.73 कोटी शेतकरी, व्यापारी आणि एफपीओ यांनी नोंदणी करुन व्यापार करत असल्याचं सांगितलं आहे.

कृषी मंत्राल्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ई-नाम हे एक इलेक्ट्रॉनिक कृषी पोर्टल आहे. संपूर्ण देशरात उत्पादित झालेल्या मालाची विक्री कऱणे, बाजार समित्यांचं नेटवर्क उभारण्याचं काम ई-नामकडून केलं जातं. तर ई-नाम पोर्टलची सुरुवात 14 एप्रिल 2016 रोजी झाली होती. ई-नाम पोर्टलमुळे शेतकरी त्यांचा माल देशात कुठही कोणत्चीह बाजार समितीत विकू शकतात.

शेतकऱ्यांसाठी फायदेशीर प्लॅटफॉर्म
ई-नाम पोर्टलवर शेतकरी इटंरनेटच्या माध्यमातून जोडले जाऊ शकतात. देशातील संपूर्ण बाजासमित्या एका मार्केटमध्ये प्रवर्तित करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या वतीनं ई-नाम पोर्टलचा फायदा शेतकऱ्यांसह ग्राहकांना देखील होईल, असं सांगण्यात आलं आहे. शेतकरी आणि व्यापारी यांचंही या पोर्टलमुळं नुकसान होणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे.

केंद्रीय कृषी अर्शशास्त्रज्ज्ञ देविंदर शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार ई-नाम पोर्टवर शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दरानं विकावा लागत आहे. त्यामुळे ज्या उद्देशानं ई-नाम सुरु करण्यात आलं तो उद्देश पूर्ण होत नसल्याचं सांगण्यात आलं आहे.

ई-नाम ची परिस्थिती काय?

–21 राज्यातील शेतकरी आणि बाजर समित्यांचा सहभाग
–1,70,66,724 नोंदणीकृत शेतकरी
–69,548 व्यापारी.
–92,079 कमिशन एजंट.
–1,856 फार्मर प्रोड्यूसर ऑर्गेनाइजेशन

Leave a Comment

error: Content is protected !!