जैविक शेतीतून घेतले ऊसाचे एकरी 114 टन विक्रमी उत्पादन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो , जैविक शेतीचे अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे सरकार देखील जैविक शेतीकडे वळण्याचे आवाहन शेतकऱ्यांना करीत आहे. एका शेतकऱ्याने एका एकर मध्ये तब्बल ११४मे. टन उसाचे यशस्वी उत्पन्न घेतले आहे. सेंद्रिय शेतीचे योग्य नियोजन करून फलटण येथील दऱ्याची वाडी येथील संदीप ज्ञानदेव कदम या शेतकऱ्याने ही किमया करून दाखवलेली आहे. झिरो बजेट शेतीचा हा त्यांचा नवीन प्रयोग इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरतो आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, खरे पाहता फलटण हा भाग म्हणजे दुष्काळी भाग अशी याची ओळख होती. मात्र धोम – बालकवडी योजनेमुळे पाणी इथल्या शेत शिवारात खेळू लागले. तसे शेतकरी देखील वेगवेगळे प्रयोग करु लागला. खरे पाहता ऊस या पिकाला भरपूर पाण्याची आवश्यकता असते. सेंद्रिय शेती आणि योग्य पाण्याचे नियोजन करीत कदम यांनी यंदाच्या वर्षी आपल्या शेतात २६५ या जातीच्या उसाची लागवड केली. सेंद्रिय पद्धतीने खत व्यवस्थापन केले आणि त्याचे फलित म्हणून तब्बल एकरी ११४ मे टन उसाचे यशस्वी उत्पादन त्यांना मिळाले .

दरम्यान शरयू साखर कारखान्याचे संचालक अविनाश भापकर , केन मॅनेजर शशिकांत खलाटे तसेच अनिल शिरके यांनी कदम यांच्या शेताला भेट देऊन पाहणी केली. तसेच त्याच्या मेहनतीबद्दल त्यांचे कौतुकही केले.

 

Leave a Comment

error: Content is protected !!