PM KISAN ; लवकरच ११ वा हप्ता जमा होण्याची शक्यता ; पण तत्पूर्वी पूर्ण करावी लागेल ‘ही’ प्रक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतातील कोट्यवधी शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी केंद्र सरकार पीएम किसान (PM KISAN) सन्मान निधी योजना राबवत आहे. ही योजना 2019 च्या फेब्रुवारी महिन्यात सुरू करण्यात आली होती, या अंतर्गत मोदी सरकार दरवर्षी 6 हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात तीन हप्त्यांमध्ये जमा करते. जानेवारी महिन्यात या योजनेचा १० वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. आता शेतकऱ्यांना ११ व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. हा ११ वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. मात्र त्यापूर्वी पीएम किसान योजनेबाबत एक महत्वाची अपडेट हाती आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी eKYC करणे अनिवार्य करण्यात आले होते. ११ वा हप्ता एप्रिल ते जुलै महिन्याच्या दरम्यान जमा होतो. PM Kisan चा ११ वा हप्ता १५ मे पर्यन्त जमा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

लाभार्थ्यांच्या यादीत तुमचे नाव कसे तपासाल ?

–सर्वप्रथम पीएम किसान(PM KISAN) योजनेच्या अधिकृत वेबसाइट वर जा.
–आता येथे तुम्हाला फार्मर कॉर्नर दिसेल, जिथे तुम्हाला क्लिक करावे लागेल.
–येथे तुम्हाला पुन्हा लाभार्थी यादीवर क्लिक करावे लागेल.
–आता येथे तुम्हाला राज्य, जिल्हा, उपजिल्हा, गाव इत्यादी माहिती भरायची आहे.
–आता Get Report वर क्लिक करा. येथे तुम्हाला पीएम किसानमध्ये तुमच्या नावाशी संबंधित माहिती दिसेल.

पीएम किसानच्या 11 व्या हप्त्यापूर्वी सरकारने ई-केवायसीची अंतिम तारीख वाढवली आहे. पंतप्रधान किसान योजनेच्या ई-केवायसीची शेवटची तारीख ३१ मे आहे.

ऑनलाईन eKYC

–पीएम किसान(PM KISAN) वेबसाइटला भेट द्या
–यानंतर, तुम्हाला उजव्या बाजूला फार्मर्स कॉर्नर पर्याय मिळेल जिथे तुम्हाला ई-केवायसी लिंक मिळेल, या लिंकवर क्लिक करा.
–आता तुमचा आधार क्रमांक आणि इमेज कोड टाका आणि सर्च बटणावर क्लिक करा
–त्यानंतर आधारशी लिंक केलेला तुमचा मोबाईल नंबर टाका आणि OTP टाका
–जर दिलेली सर्व माहिती बरोबर असेल तर ई-केवायसी पूर्ण होईल.

eKYC ऑफलाइन प्रक्रिया

तुमच्या जवळच्या CSC केंद्रावर जा आणि प्रभारी अधिकारी यांना आवश्यक तपशील द्या. तो तुमच्या अर्जावरील माहिती तपासेल आणि अपडेट करेल.

Leave a Comment

error: Content is protected !!