सिंचन योजनेच्या अंलबजावणीसाठी 200 कोटींचा निधी उपलब्ध

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्य सरकारकडून ठिबक सिंचनाकरिता 80 टक्के अनुदानाची घोषणा राज्य सरकारने केली आहे. मात्र त्यात अजून भर म्हणजे यायोजनेकरिता 200 कोटी रुपये निधी उपलब्ध असल्याची माहिती राज्य कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. यामुळे राज्यातील अधिकाधिक क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आणण्यास मदत होणार असल्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी सांगितले आहे. त्यामुळे राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन भुसे यांनी केले आहे.

अशा प्रकारे मिळेल अनुदान

–राज्यातील सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेंतर्गत सूक्ष्म सिंचन संच बसविणाऱ्या शेतकऱ्यांना पूरक अनुदान देण्याचा निर्णय शासन निर्णयाद्वारे घेतला.
— प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकन्यांना मिळणाऱ्या 55 टक्के अनुदानाव्यतिरिक्त 25 टक्के पूरक अनुदान व इतर शेतकन्यांना मिळणाऱ्या 45 टक्के अनुदानाव्यतिरिक्त 30 टक्के पूरक अनुदान उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
–अशा रितीने सूक्ष्म सिंचनाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना एकूण 75 व 80 टक्के अनुदान मिळणार आहे.
–सूक्ष्म सिंचन संच बसविणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याकरिता पूरक अनुदान देण्यासाठी लागणारा आर्थिक भार राज्य शासन उचलणार आहे.

कसा कराल अर्ज

–सर्वप्रथम इच्छूकाला महाडीबीटी ऑनलाइन पोर्टल ओपन करायचे आहे. https://mahadbtmahait.gov.in/
–यामध्ये मुखपृष्ठावर अर्ज करा असा टॅग दिसेल त्याला क्लिक करायचे आहे.
–त्यानंतर सिंचन साधने सुविधा यावर क्लिक करुन समोरील बाबी निवडा हा पर्याय ओपन करायचा आहे.
–यामध्ये जिल्हा तालुका गाव आणि वैयक्तिक माहिती भरायची आहे.
–ही माहिती भरून झाल्यानंतर मुख्य घटक मध्ये सिंचन साधने आणि सुविधा हा घटक निवडायचा आहे.
–यानंतर दिलेली माहिती पूर्ण भरायचे आहे.
–ज्या पिकासाठी आपल्याला ठिबक सिंचन पाहिजे आहे त्याची माहिती देते भरावी लागणार आहे. यानंतर पूर्वसंमती शिवाय मी योजनेचा लाभ घेणार नाही अशी नोंद करावी लागणार आहे.
–यानंतर भरलेली माहिती सेव्ह करायचे आहे.
–यानंतर मुख्य मेनू वर जाऊन ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
–मेनू वर आल्यानंतर सर्वात प्रथम ‘अर्ज सादर करा’ यावर क्लिक करायचे आहे.
— यानंतर तुम्हाला तालुका हे ऑप्शन दिसेल शिवाय तुम्ही ज्यासाठी अर्ज केला आहे त्या योजनेचे नाव देखील येते समोर येईल.
–यानंतर प्राथमिक प्रधान्य क्रमांक देऊन अटी-शर्ती त्या मान्य असल्याचे नमूद करावे लागणार आहे.
–यानंतर आपल्याला अर्ज सादर करावा लागणार आहे.
–पूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतर 23 रुपये 60 पैसे आपल्या अकाउंट मधून भरावे लागणार आहेत याची प्रक्रिया ही ऑनलाइन करता येणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!