नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारांचं अनुदान, वीज दरात सवलत : मुख्यमंत्र्यांची घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी दिलासा देणाऱ्या घोषणा आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या आहेत. यात जे शेतकरी नियमित कर्जाची परतफेड करत होते, त्यांना 50 हजार रुपये इन्सेंटिव देण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच शेतकऱ्यांना वीज दरात उपसा सिंचनमध्ये प्रति युनिट एक रुपयांची सवलत देण्यात आली आहे. अशी माहिती त्यांनी पत्रकरांशी बोलताना दिली आहे.

शेतकऱ्यांना 50 हजारांचं अनुदान

याबाबत माहिती देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “आजच्या कॅबिनेट मध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. जे शेतकरी नियमित कर्जाची परतफेड करत होते, त्यांना 50 हजार रुपये इन्सेंटिव देण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. सरसकट नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. त्याचा 14 लाख शेतकऱ्यांना फायदा होईल. 6 हजार कोटी रुपये शासनाच्या तिजोरीतून देण्यात येतील. 3 वर्ष कर्जफेडीची मुदत 2 वर्ष करण्यात आली आहे” असं एकनाथ शिंदे म्हणाले.

वीज दरात सवलत

वीज ग्राहकांना प्रीपेड मीटर आणि स्मार्ट मीटर देण्याची योजना आखण्यात आली आहे. त्यासाठी 39 हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. त्याचा 1 कोटी 66 लाख ग्राहकांना फायदा होणार. त्यामुळे कोणत्याही ग्राहकाला मीटर घेण्यसााठी चार्ज घेतले जाणार नाही. उपसा जलसिंचन योजनेतील. अतिउच्चदाब, उच्चदाब व लघुदाब उपसा जलसिंचन योजनेच्या शेतकऱ्यांकडून 2 रुपये 16 पैसे वीज दरानुसार रक्कम आकारली जात होती. तो एक रुपया 16 पैसे केला. म्हणजे प्रति युनिट एक रुपया सवलत दिली आहे. त्यामुळे कृषी ग्राहकांना मोठा फायदा होईल.

पुढे बोलताना ते म्हणाले, ग्रामीण भूमिहीन घरकुल योजनेबाबत निर्णय घेण्यात आला असून आता मोजणी शुल्कात 50 टक्के सवलत देण्यात आली आहे. पैठणमध्ये उपसा सचिन योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे जवळपास 40 गावांना याचा फायदा होणार आहे. तसेच मराठवाड्यात बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन प्रशिक्षण केंद्र आहेत्याला 100 कोटी निधी मंजूर करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!