6 एकर पीक पाण्यात,भरपाई नाही ; ऐन दिवाळीत कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : कर्ज,उचल घेत पीक पेरणी केली.मात्र अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाल्याने, व शासकीय मोबदलाही न मिळाल्याने हवालदिल होऊन मेटाकुटीला आलेल्या कर्ता तरुण शेतकऱ्याने एन दिवाळीत शेतातच विष प्राशन करून आत्महत्या केल्याची मन हेलावून टाकणारी घटना औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील आंचल गावात घडली आहे. योगेश वाल्मिक मगर वय-27 (रा.अनचल गाव, ता.वैजापूर) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

योगेशच्या वडिलांच्या नावावर सहा एकर शेती आहे.आई-वडील वृद्ध असल्याने योगेशच घराचा कर्ता पुरुष आहे. पत्नी मुलं असा संपूर्ण परिवार शेतातच वात्सव्यस आहेत. दरवर्षी अस्मानी संकट सुरूच आहे. या वर्षी तरी चांगला पीक येईल या आशेने योगेश ने तीन एकर कापूस आणि तीन एकर मका लागवड केले होते. मात्र एन वेळी परतीच्या पावसाने कहर केला. शेतच शेततळे झाले आणि लहान लेकराप्रमाणे वाढवून मोठं केलेलं हातातोंडाशी आलेल पीक होत्याच न्हवत झालं.पीक पेरणी साठी घेतलेले कर्ज फेडायचे कशे? दिवाळी साजरी करायची काशी? ही चिंता योगेशला नेहमी सतावत होती.मात्र शासना कडून नुकसान भरपाई मिळेल या आशेने तो धीर मिळत गेले.

मात्र दिवाळी दोन दिवसांवर येऊन ठेपली असताना देखील घरात आर्थिक चणचण, कर्जदारांचं तगादा सहन न झाल्याने रविवारी संध्याकाळी योगेश ने शेतात विषारी औषध प्राशन केली.तेंव्हा पासून त्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.उपचार दरम्यान आज पहाटे घाटी रुग्णालयात योगेश ची प्राण ज्योत मालवली.या प्रकरणी शिऊर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्यात आली आहे. एन दिवाळीत घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे गावात एकच शोककळा पसरली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!