पाथरी तालुक्यात 686 हेक्टर वर रब्बीच्या पेरण्या…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : पाथरी ता. प्रतिनिधी

ऑक्टोबर मध्ये झालेल्या परतीच्या सततच्या पावसाने खरीपातील सोयाबीनचे नुकसान झाले असताना नुकसान झालेल्या पिकांची काढणी केल्यानंतर जमिन मशागतीसाठी शेतकर्यांना वेळ लागत आहे. कृषी विभागाच्या 1 ऑक्टोबर रोजी आलेल्या अहवालानुसार तालुक्यातील शेतशिवारांमध्ये प्रस्ताविक क्षेत्राच्या केवळ 686 हेक्टर क्षेत्रावर रब्बीच्या पेरण्या शेतकऱ्यांनी केल्या आहेत.

यंदा खरीप हंगाम जोमात आलेला असताना पावसाने ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यामध्ये मोठा खंड दिला. त्यानंतर पावसाने दमदार हजेरी लावली परंतु ऐन काढणीच्या वेळी ऑक्टोबर महिन्यामध्ये पावसाने अतिवृष्टीसह सततच्या पाऊस होत हजेरी लावली. त्यामुळे काढणीस आलेले सोयाबीन कापूस पिकाचे प्रचंड नुकसान झाले .खरिपाच्या पीक काढण्याची लगबग एकीकडे शिवारात असताना काढणी झालेल्या क्षेत्रावर रब्बीच्या पेरणी करण्यासाठी शेतकरी लगबग करत आहेत.

दरम्यान माथ्याच्या ठिकाणी वाफसा असल्याने मशागत करत रब्बीच्या पेरण्या सुरू झाले आहेत. तर सखल भागामध्ये अजूनही शेती मशागत करणे अवघड जात असल्याने पेरण्या खोळंबलेल्या अवस्थेत आहेत. पाथरी तालुका कृषी विभागाला या रब्बी हंगामामध्ये 17 हजार 73 हेक्टर सरासरी क्षेत्रावर रब्बी पेरणी तालुक्यातील शेतकरी करतील अशी अपेक्षा आहे. एक ऑक्टोबर रोजी आलेल्या अहवालानुसार तालुक्यातील शेतकऱ्यांनी 257 हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची , 423 हेक्टर क्षेत्रावर हरभऱ्याची तर 06 हेक्टर क्षेत्रावर करडईची पेरणी केली आहे. सध्या म्हणावी तेवढी थंडी पडत नसून ज्वारी व हरभरा पेरणीसाठी वातावरण पोषक आहे परंतु पुढील काही दिवसात थंडीत वाढ झाल्यानंतर ज्वारीच्या पेरणी करण्यास अडचण होणार आहे असे शेतकरी सांगत आहेत. स्थानिक शेतकऱ्यांना खरिपात झालेल्या नुकसानीनंतर रब्बी हंगामा कडून मोठी अपेक्षा आहे .

error: Content is protected !!