पीकविमा न देणाऱ्या 11 बँकांवर कारवाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: जळगाव जिल्ह्यात सुमारे दहा हजार शेतकऱ्यांनी पीक विमा काढल्यावरही बँकांनी त्रुटी दूर केली नसल्याने त्यांना नुकसानभरपाई मिळालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे अकरा राष्ट्रीयीकृत व खाजगी बँकांवर गुन्हे नोंदवण्याचे सूचना पोलिसांना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने दिल्या आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या सोमवारी 30 तारखेला झालेल्या बैठकीत पिक विमा न मिळाल्याबाबत खासदार रक्षा खडसे यांच्यासह अनेक आमदार समितीच्या सदस्यांनी तक्रार केली होती. तसेच यात जिल्हा पोलिस अधीक्षकांनी लक्ष घालण्याची मागणी केली होती. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांनी भरूनही पिकांची नुकसान भरपाई न मिळाल्याने अकरा बँकांवर गुन्हे दाखल करून जबाबदारी निश्चितीची प्रक्रिया सुरू केली आहे. यात आयसीआयसीआय बँकेकडे 11 कोटी 35 लाखांची विमा रक्कम अडकली आहे. सोबत स्टेट बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक इतर विविध बँकांच्या शाखांचा समावेश आहे.

शेतकऱ्यांनी या बँकेकडे पीक विम्याची रक्कम भरली होती. वर्षभरात पिकांचे नुकसान होऊन विमा कंपन्यांकडून विमा घेण्याची वेळ आली असता बँकांनी भरलेल्या माहितीत अनेक चुका आढळून आल्या त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना पीक विमा चा लाभ मिळू शकत नाही.

काय आहे शासन निर्णय?

पिक विमा भरल्यानंतर नुकसान झाल्यानंतर विम्याची रक्कम मिळाली नसल्याची चूक ज्यांची आहे त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करून त्यांच्याकडून विम्याची रक्कम द्यावयाची आहे. जिल्ह्यातील सुमारे दहा हजार शेतकऱ्यांनी वरील बँकांमध्ये पीक विम्याची रक्कम भरली. असे असताना बँकांनी शेतकऱ्यांचे आधार कार्ड घेतले जेव्हा माहिती भरली तेव्हा आधार कार्ड वरील नावाचा खाते क्रमांकाचा चुका झाल्या आहेत. त्यामुळे पीक विमा कंपन्या विम्याची रक्कम देण्यास नाकारत आहेत. यामुळे कृषी विभागानं शासनाच्या निर्णयानुसार बँकांवर जबाबदारी निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू केली सोबत या शाखांमध्ये पैसे भरले त्याचा खान विरोधात गुन्हे नोंदवण्यात येत आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!