कापूस दराचा स्वॅग ‘पुष्पा’ प्रमाणेच ,झुकेगा नही… ! सोमवारी मिळाला 11 हजार845 इतका विक्रमी दर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाइन : मागील वर्षी खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले. परिणामी कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली. मात्र व्यापाऱ्यांकडून कापसाला मोठी मागणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कापसाला चांगला दार मिळाला. कापसाच्या दरातील तेजी आता हंगाम संपत आला तरी कायम आहे. सोमवारी आकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला विक्रमी 11 हजार 845 इतका दर मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे.

ज्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी यंदा कापसाची साठवणूक केली आणि आता त्यांनी कापूस विक्रीस बाहेर काढला त्यांना अधिक फायदा झाल्याचे दिसून येते आहे. दरम्यान आकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला सुरवातीपासूनच चांगला दर मिळत आहे. शेतकऱ्यांनी साठवणूक केलेल्या कापसाची विक्री केली. त्यामुळे वाढत्या दराचा फायदा हा व्यापाऱ्यांनाच होत असल्याचे बोलले जात आहे. वाढीव दर मिळवण्यासाठी सबंध चार महिने जे शेतकऱ्यांनी केले त्यापेक्षा महिनाभरात अधिकचा मोबदला हा व्यापाऱ्यांना मिळालेला आहे.

खरीप २०२२ : कापसाचे बियाणे महागण्याची शक्यता

कापसाच्या वाढत्या भावाचा परिणाम आगामी खरीप हंगामापर्यंत जाणवणार आहे. आतापर्यंतच्या वाढत्या दराने खासगी कंपन्यांसह व्यापाऱ्यांनाही हैराण केले आहे. सध्या कापूस हंगाम शेवटच्या टप्प्यात आहे.मात्र यानंतर शेतकऱ्यांना बियाणांच्या वाढत्या दराचा सामना करावा लागणार आहे. महागाईचा सामना करण्यासाठी त्यांना सज्ज राहावे लागेल. शेतकरी आधीच खते आणि डिझेलच्या महागाईशी झगडत आहेत. यंदा कापसाचा विक्रमी भाव 11 हजार रुपये प्रतिक्विंटल झाला आहे, त्यामुळे येत्या खरिपात कापसाचे क्षेत्र वाढणे स्वाभाविक आहे. कापूस बियाणे विकणाऱ्या कंपन्यांनी त्याची किंमत वाढवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. बियाणे उत्पादन आणि संशोधन इत्यादींचा खर्च पाहता दर वाढण्याची अपेक्षा बियाणे उत्पादकांनी व्यक्त केली आहे.

कापूस बाजारभाव

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
21/03/2022
सावनेरक्विंटल360097001035010100
आर्वीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल9268200107009400
जामनेरहायब्रीडक्विंटल248015100509900
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल5039000104009700
उमरेडलोकलक्विंटल59685001070010600
मनवतलोकलक्विंटल200084001117511000
काटोललोकलक्विंटल2048000105009000
मंगरुळपीरलांब स्टेपलक्विंटल768000106009800
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल202885001131510950
परभणीमध्यम स्टेपलक्विंटल45080001100010650
हिमायतनगरमध्यम स्टेपलक्विंटल25940096009500

Leave a Comment

error: Content is protected !!