खरिपाचे नुकसान मात्र रब्बीच्या आशा पल्लवित; मराठवाड्यात पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी मुबलक पाणीसाठा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात झालेल्या दमदार पावसामुळे मराठवाड्यातील आठही प्रकल्प भरले आहेत. त्यामुळे पिण्याचा आणि शेती सिंचनाचा प्रश्न हा मार्गी लागलेला आहे. या पावसामुळे मात्र खरिपाच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

मराठवाड्यात जायकवाडी, मांजरा, निम्न तेरणा ही मोठी धरणे आहेत. यामध्ये औरंगाबादला पाणीपुरवठा करणारे जायकवाडी धरणात 53.50 टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या आठवड्यात सबंध मराठवाड्यात मुसळधार पाऊस झाला होता. परिणामी, महत्वाचे आठही प्रकल्प ओसंडून वाहत आहेत. जायकवाडीमुळे औरंगाबादचा पिण्याच्या पाण्याचा आणि शेती सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला आहे. तर उस्मानाबाद, लातुर आणि बीड जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे मांजरा धरण हे 88 टक्के भरलेले आहे. त्यामुळे या तीनही जिल्ह्याचा पाणीप्रश्न हा मिटलेला आहे.

मराठवाड्यातील पाणीसाठा

माजलगाव धरण 94 टक्के
मांजरा धरण 88 टक्के
निम्न दुधना 96 टक्के
येलदरी 100 टक्के
सिध्देश्वर 97 टक्के
पेनगंगा 96 टक्के
मानार 100 टक्के
निम्न तेरणा 72
विष्णूपुरी 92 टक्के

रब्बीसाठी मुबलक पाणी

पावसामुळे खरिपातील पिकांचे नुकसान झाले असते तरी रब्बी हंगामात ऐन गरजेच्या प्रसंगी पाणी मिळणार आहे. शिवाय मांजरा नदीकाठचा परिसर हा ग्रीन बेल्ट म्हणून ओळखला जातो. या क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड केली जाते. यंदा या शेती क्षेत्रालाही याचा फायदा होणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!