तज्ञांच्या म्हणण्यानुसार ‘या’ तारखेपर्यंत करा उन्हाळी सोयाबीनची लागवड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सोयाबीन बाजारभाव पाहता सध्या सोयाबीनचे भाव स्थिर आहेत. सोयाबीनला ६००० ते ६५०० पर्यंत चांगला भाव मिळतो आहे. मागच्या दोन वर्षातील सोयाबीनचे बाजार तेजीत असल्यामुळे इतर पिकांना फाटा देत शेतकऱ्यांनी आपला मोर्चा सोयाबीनकडे वळवला आहे. सध्या उन्हाळी सोयाबीनची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु आहे. उन्हाळी सोयाबीनची पेरणी १५ तारखेपर्यंत करावी असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील तज्ञ समितीने केला आहे.

शेतकऱ्यांचा कल सोयाबीनकडे

सध्या अनेक शेतकऱ्यांचा कल हा सोयाबीनचे उत्पादन घेण्याकडे आहे. सध्या भुईमुगाची लागवड केली जाते. मात्र भुईमुगापेक्षा अनेक शेतकऱ्यांचा कल हा सोयाबीनचे उत्पादन घेण्याकडे आहे. उन्हाळी सोयाबीनची लागवड ही मुख्यतः खरिपातील बियाणे मिळण्यासाठी केली जाते मात्र बियाण्यांसोबतच उत्पादन म्हणूनही शेतकरी सोयाबीन लागवड करीत आहेत. सोयाबीन या पिकाची गणना नागदी पीक म्हणून केली जाते . २०२१ मध्ये खरिपातील अतिवृष्टी मुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले. मात्र दर चांगला असल्याने अद्यापही सोयाबीन घेण्याकडेच शेतकऱ्यांचा कल आहे. शिवाय सध्या चांगला पाऊस झाल्याने पाण्याची देखील उपलब्धता आहे. त्यामुळे अतिवृष्टीत घटलेले सोयाबीनचे उत्पादन उन्हाळी सोयाबीनच्या माध्यमातून भरून काढणे शक्य आहे. जरी सोयाबीन पेरणी १५ तारखेपर्यंत करण्यास सांगितले असले तरी काही शेतकरी २५ तारखेपर्यंत पेरणी करू शकतात.

या कारणामुळे सोयाबीनला शेतकऱ्यांची पसंती

१) सोयाबीनला मिळणारा दर
२) सोयाबीन पेरणीपासून काढणीपर्यंत उपलब्ध झालेले तंत्रज्ञान
३)पाऊस चांगला झाल्यामुळे पाण्याची उपलब्धता
४)केवळ साडेतीन महिन्यात येणारे पीक
५) कृषी विद्यापीठे आणि कृषीतज्ञांचा सल्ला.
६) बाजारात वाढलेली मागणी

Leave a Comment

error: Content is protected !!