PM KISAN योजनेतील अपात्र शेतकऱ्यांचे खाते सील ; ११ वा हप्ता येण्यापूर्वी काय केला धोरणात बदल ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : प्नतप्रधान नरेंद्र मोदी यांची अत्यंत महत्तवाकांक्षी योजना म्हणेज पी एम किसान योजना होय. ही योजना अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी, गरजू शेतकऱ्यांसाठी लाभदायी ठरलीय मात्र काही अपात्र शेतकऱ्यांनी या योज़नेच लाभ घेतला आहे. अशा अपात्र शेतकऱ्यांकडून रक्कम वसुलीची मोहीम केंद्र सरकार ने राबवायला सुरवात केली असून काही जणांकडून रक्कम वसुली देखील करण्यात आली आहे.

अपात्र शेतकरी योज़नेचा लाभ घेत असल्याचे लक्षात आल्याने सरकारने या योजने संदर्भांत धोरणच बदलेले आहे. नुकतच १ जानेवारीला पी एम किसानचा १० वा हप्ता जमा झाला आहे. आता ११ व्या हप्त्याकरिता मात्र शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याबरोबरच अपात्र शेतकऱ्यांकडून पैसे वसूल करण्याबाबतही महसूल विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार ,आतापर्यन्त बीड जिल्ह्यातून २ हजार अपात्र शेतकऱयांनी रक्कम परत केली आहे. या योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यातील 2 लाख 4 हजार शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळालेला आहे. 10 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाल्यानंतर ही यादी जिल्हा प्रशासनाने समोर आणली आहे. याकरिता 40 कोटी 83 लाख रुपयांचा निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे. तर 2 हजार 91 शेतकरी हे अपात्र ठरले आहेत. ज्यांनी आयकर भरुनही लाभ घेतला आहे अशा अपात्र शेतकऱ्यांनी 2 कोटी 1 लाख रुपये परतही केले आहेत. यामुळे योजनेच्या धोरणांमध्ये बदल करण्यात आला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!