खरीप हंगामासाठी प्रशासनाने नियोजन करावे ः पालकमंत्री जयंत पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली | लॉकडाऊन संपल्यानंतर खरीप हंगामासाठी खते, बी-बियाणे यांचा सुरळीत पुरवठा व्हावा. या दृष्टीने कृषि निविष्ठांची दुकाने काही काळ उघडी ठेवण्याबाबत मंत्रीमंडळाच्या बैठकीत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे प्रतिपादन जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.

खरीप हंगामपूर्व नियोजन आढावा बैठक पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व्हीडिओ कॉन्फरन्सींगव्दारे घेण्यात आली. या बैठकीस सहकार व कृषि राज्यमंत्री विश्वजीत कदम, खासदार संजय पाटील, आमदार अरूण लाड, गोपीचंद पडळकर, अनिल बाबर, मानसिंगराव नाईक, सुमनताई पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी तसेच विविध विभागांचे अधिकारी व्हीडिओ कॉन्फरन्सींगव्दारे उपस्थित होते.

जिल्ह्यात खरीप हंगाम व्यवस्थितपणे पार पडावा यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक बी-बियाणे, खते, कीटकनाशके यांचा सुलभ व सुरळीतपणे पुरवठा व्हावा यासाठी आवश्यक ते सर्व नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्री जयंत पाटील यांनी यावेळी दिल्या.

Leave a Comment

error: Content is protected !!