टोमॅटो, शिमला मिरची नंतर आता पपईचे भाव घसरले; शेतकरी हैराण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात टोमाटो शिमला मिरचीला कवडीमोल भाव मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी घाम गाळून पिकवलेला माल रस्त्याकडेला फेकल्याची उदाहरणे ताजी असताना आता पपईला देखील कमी भाव मिळत असल्याचे निदर्शनास आले आहे . लातूरातल्या एका शेतकऱ्याला 7-8 रुपये किलोने पपई विकावी लागत आहे. किमतीबाबत त्याला सरकारकडून कोणतीही मदत मिळत नाही. त्यामुळे हा शेतकरी त्रस्त झाला आहे.

तीन वर्षांपूर्वी श्रीमान भोसले यांनी पपईची शेती सुरू केली होती. यावर्षी पपईला चांगलाच बहार आलाय. पण नशिबात काही वेगळंच लिहलं होत, पपईला बाजारात फक्त 7 ते 8 रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. यामुळे त्यांना पपई लागवडीसाठी लागलेला खर्च देखील भेटणार नाही असं चित्र त्यांना दिसत आहे. आणि त्यांना प्रश्न पडलाय की जर एवढी कमी कमी किंमत भेटत राहिली तर कस काय शेतकरी आपला उदरनिर्वाह करेल असा प्रश्न सतावत आहे.

श्रीमान संग्राम भोसले सांगतात की त्यांच्याकडे अडीच एकर बागायती शेत आहे. त्यांच्यामते, यंदा पपई लागवडीसाठी एकूण 3 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. भोसले सांगतात की, खुप मेहनत केल्यानंतर यंदा पपईला ईश्वराच्या कृपेनें खूपच चांगला बहार आलाय, पण देव एका हाताने देतो आणि दुसऱ्या हाताने हिसकावतो अशीच गत झालीय चांगला बहार आला खरी पण पपईला किंमत काही मिळत नाही.

शेतकरी कष्ट करून, घाम गाळून सोन्यासारखे पिक पिकवतो, पण त्याच्या सोन्यासारख्या मालाला खरी किंमत देणे त्याच्या हातात नाही. ते म्हणतात ना, पिकत तिथे विकत नाही ही म्हण शब्दशा आणि अर्थाने ह्या प्रसंगी खूपच तंतोतंत बसते. भोसले सांगतात की, परिस्थिती एवढी बिकट बनली आहे की पपई शेतातून बाजारात नेण्याचा खर्चही निघत नाही आहे. आणि दुष्काळात तेरावा महिना म्हणुन मुसळधार पावसामुळे पिकाचे नुकसानहोत आहे ते वेगळंच. बोलताना भोसले म्हणतात, सरकारला विनंती आहे की शेतकऱ्यांना काहीतरी आर्थिक मदत द्या.

किरकोळ विक्रीसाठी पपई चा भाव चक्क 40 रुपये किलो

भोसले यांनी सांगितले की, दोन वर्षांपूर्वी पपईची लागवड केली होती, तेव्हा पाऊस खूपच कमी पडला आणि परिस्थिती पार दुष्काळासारखी झाली. त्या वेळी, उन्हाळ्यात चक्क, पाणी विकत घेऊन झाडांना दिले जात होते. कशीबशी पपईची बाग जिवंत ठेवली होती. पपईचा दाम हा फक्त घाऊक बाजारात कमी झाला आहे मात्र किरकोळ बाजारात ते 40 रुपये प्रति किलो दराने विकले जात आहे. घाऊक बाजारात कमी भाव असल्याने शेतकऱ्याला किरकोळ बाजारापेक्षा अनेक पटीने कमी पैसे मिळत आहेत. जर किरकोळ बाजारात चांगला दर मिळू शकतो, तर मग शेतकऱ्यांनाही चांगला भाव मिळाला पाहिजे. अशी आर्त हाक भोसले यांनी सरकारला केली.

 

Leave a Comment

error: Content is protected !!